28 व 29 जुलै रोजी इव्हीएम मशिनची अभिरुप मतदान प्रक्रीया ..मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी उपस्थित राहावे..निवडणूक विभागाचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
28 व 29 जुलै रोजी
इव्हीएम मशिनची अभिरुप मतदान प्रक्रीया
मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी उपस्थित राहावे
निवडणूक विभागाचे आवाहन
वाशिम, दि. 24 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हयाकरीता EVM/VVPATs नवीन प्राप्त मशिनच्या प्रथमस्तरीय तपासणी 4 जुलै 2023 पासून सुरु करण्यात आली आहे. या मशिनमध्ये आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे प्रथमस्तरीय तपासणी FLC OK झालेल्या मशिन्सपैकी 1 किंवा 2 टक्के मशिन्सची अभिरुप मतदार प्रक्रीया (MOCK POLL) करण्यात येणार आहे.
जिल्हयाकरीता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 साठी प्राप्त EVM/VVPATs मशिन्सची अभिरुप मतदान प्रक्रीया (MOCK POLL) नविन EVM/VVPATs गोडाऊन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 28 व 29 जुलै 2023 रोजी सकाळी 8 वाजतापासून करण्यात येणार आहे. ही प्रक्रीया करतेवेळी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे. असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment