कांडप यंत्र व पीठ गिरणी योजना अर्ज करण्यास मुदतवाढ



कांडप यंत्र व पीठ गिरणी योजना
अर्ज करण्यास मुदतवाढ

 वाशिम,दि.२१ (जिमाका) ग्रामिण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेत मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात येत असलेल्या २० टक्के निधीमधुन जिल्हयातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती व नवबौध्द या मागासवर्गीयांकरीता कांडप यंत्र पुरविणे या योजनेकरीता सन २०२३-२४ या वर्षासाठी लाभार्थ्यांनी समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद वाशिम येथे २८ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करावे.तसेच दिव्यांगांकरीता राखीव ठेवण्यात येत असलेल्या ५ टक्के निधीमधुन ग्रामीण भागातील दिव्यांग गरजूंकरीता पीठ गिरणी ही योजना सन २०२३-२४ या वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. ज्या दिव्यांगाचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेकरीता समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद, वाशिम येथे १ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करावे.जिल्हयातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांनी केले आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे