२५ व २६ जूलै ऑनलाईन रोजगार मेळावा




२५ व २६ जूलै ऑनलाईन रोजगार मेळावा

वाशिम,दि.२१(जिमाका) जिल्हयातील नोकरी / रोजगार इच्छूक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या
उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम कार्यालयाच्या वतीने २५ ते २६ जूलै २०२३ दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
         या ऑनलाईन मेळाव्यामध्ये क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण,वाशिम / अकोला, हयोसुंग इंडीया प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर,हिताचि आस्टेमो ब्रेक सिस्टिम इंडीया,प्रा.लि.बांभोरी - जळगांव,एल.आय.सी.विमा कार्यालय,वाशिम,पिपल ट्री व्हेन्चर्स प्रा. लि. पूणे / छत्रपती संभाजीनगर धुत ट्रॉन्समिशन प्रा.लि.छत्रपती संभाजीनगर इत्यादी नामांकित कंपनी /उद्योगाकडील उद्योजक वा त्यांचे प्रतिनिधी मेळाव्यात ऑनलाईन सहभाग नोंदविलेल्या नोकरी इच्छूक उमेदवारांच्या पुढील टप्प्यात ऑनलाईन / प्रत्यक्ष मुलाखती घेवून निवड प्रक्रिया पूर्ण करतील. यासाठी १० वी,१२ वी,आय.टी.आय. (सर्व ट्रेडस्), पदवीधर (कला/वाणिज्य/विज्ञान),पदव्युत्तर पदवी (सर्व शाखा) इ. शैक्षणीक पात्रता असणारे वयोमर्यादा - १८ ते ४५ मधील युवक-युवतीना ६८ पदांकरीता रोजगार मिळविण्याची संधी प्राप्त होणार आहे.
      या अनुषंगाने वाशिम व इतर जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांना www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम नोंदवून सहभागी होता येणार आहे.ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी
होणा-या उमेदवारांना त्यांचेकडील सेवायोजन कार्डच्या युझरनेम व पासवर्डमधुन मेळाव्यात सहभागी
होता येईल.असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्राचे सहायक आयुक्त,प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.
               या रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होण्याची प्रक्रीया/ पध्दत पुढील प्रमाणे आहे.एम्पॉयमेंट कार्डमधील युझरनेम व पासवर्ड असावे. रोजगार  नसल्यास www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Job Seeker वरील Register वरुन युझरनेम व पासवर्ड मिळवावा त्यानुसार सहभागी झालेल्या,त्यानंतर Job Seeker च्या विंडोमध्ये लॉगीन करुन डाव्या बाजुकडील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर वर क्लीक करावे. वाशिम जिल्हा निवडुन त्यातील ONLINE ROJGAR MELAWA 2023 - WASHIM
मध्ये नमुद पात्रतेनुसार पदांवर अप्लाय करावे.त्यावेळी Applied असा मेसेज दिसेल.या पध्दतीने ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होता येईल.नोंदणीबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. ०७२५२-२३१४९४ या दुरध्वनीवर संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे