सुरक्षित फवारणी अभियान फवारणी रथाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
सुरक्षित फवारणी अभियान
फवारणी रथाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
वाशिम, दि.२८ (जिमाका) कृषी विभाग व सिंजेन्टा इंडिया प्रा.लि. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेरनेस अँड रिफॉर्म- इसार, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने "सुरक्षित फवारणी अभियान - २०२३ अंतर्गत सुरक्षित फवारणी रथाचा शुभारंभ आज २८ जूलै रोजी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., यांच्याहस्ते रथाची फित कापून करण्यात आला.यावेळी आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी गणेश गिरी,सिंजेन्टा कंपनी, पूणेचे श्री.राजशेखर, श्री.मनोहर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आजपासून पुढील ४५ दिवस हा सुरक्षित फवारणी रथ जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये जाऊन कीटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाच्या खबरदारीबाबत शेतकरी बांधवांना फवारणीचे मार्गदर्शन करून जनजागृती करणार आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांनी या सुरक्षा फवारणी रथाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन पिकांवर फवारणी करावी.असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
*******
Comments
Post a Comment