मासेमारी साधने खरेदीसाठी मिळणार अर्थ सहाय्य
- Get link
- X
- Other Apps
मासेमारी साधने खरेदीसाठी
मिळणार अर्थ सहाय्य
वाशिम, दि. 07 (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2023-24 या वर्षात मासेमारी साधने खरेदीवर अर्थसहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेकरीता जिल्ह्यातील सर्वसाधारण, अनुसुचित जाती व आदिवासी उपक्षेत्राबाहेरील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांमधील सभासदांना प्रती सभासद 20 किलो याप्रमाणे मत्स्यव्यवसाय विभागामार्फत अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे. मासेमारी साधने खरेदीवर अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत मासेमारी करण्यासाठी बिगर यांत्रिकी नौका (लाकडी नौका, पत्रा नौका, फायबर नौका) या मत्स्यव्यवसाय उपयोगी साधनांसाठी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी प्रस्तावासोबत संस्थेच्या लेटर पॅडवर विनंती अर्ज, संस्थेचा ठराव, संस्थेचा रद्द केलेला धनादेश, सभासद यादी, संस्थेचे पॅनकार्ड, संस्थेचे बॅक खाते पासबुक, अनुसुचित जाती/जमाती प्रवर्गातील सभासदांचे जातीचे दाखले आदी आवश्यक कागदपत्रे जोडुन प्रस्ताव कार्यालयास सादर करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, वाशिम यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment