माउंट कार्मेल स्कुल येथे कायदेविषयक जनजागृती
- Get link
- X
- Other Apps
माउंट कार्मेल स्कुल येथे
कायदेविषयक जनजागृती
वाशिम, दि. 19 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने १७ जुलै रोजी जागतिक न्याय दिनानिमित्त स्थानिक माउंट कार्मेल इंग्लिश स्कुलमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. अध्यक्ष म्हणून माउंट कार्मेल स्कुलचे प्राचार्य फादर नेल्सन होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विजय टेकवानी, मुख्यलोक अभिरक्षक ॲड.परमेश्वर शेळके व प्रांजल काकाणी यांची उपस्थिती होती.
श्री. टेकवानी यांनी पोक्सो ॲक्ट विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. श्री. काकानी यांनी विद्यार्थ्यांना एलसीडी प्रोजेक्टर कायद्याबाबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधी स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment