शासन आपल्या दारी तालुका स्तरीय शिबीर उत्साहात संपन्न


शासन आपल्या दारी तालुका स्तरीय शिबीर उत्साहात संपन्न 

वाशिम,दि.१५ (जिमाका) कारंजा येथील देशमुख मंगल कार्यालय येथे आज १५  जुलै रोजी शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटणी होते. प्रमुख अतिथी म्हणून कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे,तहसीलदार कुणाल झाल्टे,जि.प.चे समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती वैशाली लळे, कारंजा पंचायत समिती सभापती सभापती छोटूबापू देशमुख, उपसभापती श्री.अंबरकर,गटविकास अधिकारी प्रफुल तोटेवाड, मुख्याधिकारी दीपक मोरे,तालुका आरोग्य अधिकारी शंकर नांदे, तालुका कृषी अधिकारी श्री.जटाळे यांची प्रमुख उपस्थिती होती .       
         यावेळी आमदार श्री.पाटणी व अन्य मान्यवरांचे हस्ते लाभार्थ्यांना ट्रॅक्टर,विविध प्रमाणपत्र,कीट, प्रमाणपत्र,आभा कार्ड,गोल्डन कार्ड व दाखल्यांचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आले.यावेळी महसूल विभाग,पंचायत समितीतील विविध विभाग,कृषी विभाग,नगर परिषद कारंजा व आरोग्य विभागाचे वतीने ६१२८ लाभार्थांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. 
         यावेळी श्री वऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले.ज्ञायक पाटणी,राजीव काळे,ललित चांडक,गुड्डू पाटील कानकिरड,प्रमोद लळे,संकेत नाखले यांचीही उपस्थिती होती.
      विविध योजनांचे लाभार्थी,मंडळ अधिकारी,तलाठी,कोतवाल व महसूल कर्मचारी. न.प.कारंजा, पं.स.कारंजा,कृषी कार्यालय कारंजा, आरोग्य विभाग कारंजाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
      प्रास्ताविक तहसीलदार श्री. झाल्टे यांनी केले. संचालन तलाठी राहुल वरघट यांनी तर आभार नायब तहसिलदार विकास शिंदे यांनी मानले.या कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे