नैसर्गिक आपत्ती प्राथमिक अहवाल; जिल्ह्यात २ पशूधन मृत व १४ घरांची अंशतः पडझड


नैसर्गिक आपत्ती प्राथमिक अहवाल; जिल्ह्यात २ पशूधन मृत व १४ घरांची अंशतः पडझड  

वाशिम,दि.२२(जिमाका) जिल्ह्यात २२ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत मागील २४ तासात सरासरी ३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळपासूनच सुरू असलेला संततधार पाऊस व पुरामुळे पशुधन व घरांची पडझड आदी नुकसान झाले.      
              प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार मानोरा तालुक्यात २ जनावरे मृत्युमुखी पडली. मानोरा तालुक्यात ४, मंगरूळपीर तालुक्यात २,रिसोड तालुक्यात १ व कारंजा तालुक्यात ७ अशा एकूण १४ घरांची अंशतः पडझड झाली.आज २२ जुलै रोजी जिल्ह्यात कारंजा,मानोरा, मालेगाव व मंगरूळपीर तालुक्यात पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पिक व शेतजमीनीच्या नुकसानीची माहिती तालुकास्तरावरून सद्यस्थितीत अप्राप्त असल्यामुळे शेत पिकांचे व जमिनीचे नुकसान या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलेले नाही.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित