पिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी अनुदानासाठी चालु बँक खाते क्रमांक दयावा




पिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी

अनुदानासाठी चालु बँक खाते क्रमांक दयावा

        वाशिम, दि. 17 (जिमाका) : तालुका आपत्ती व्यवस्थापन/ नैसर्गीक आपत्ती प्राधिकरणाच्या वतीने वाशिम तालुक्यातील शेतकऱ्यांचे ऑगस्ट २०२२ मध्ये ९ मंडळातील एकूण १३३ गावात अतिवृष्टी होवून शेत पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी शासनाकडून ५२ कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. या निधीमधून बाधीत शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे, परंतू नुकसानीची आर्थिक मदत अद्यापही मिळाली झाली नाही, अशा शेतकऱ्यांनी २७ जुलै २०२३ पर्यंत आपल्या तलाठयाकडे चालु बँक खाते क्रमांक दयावा. जेणेकरुन पात्र बाधीत लाभार्थी शेतकऱ्यांना तहसिल कार्यालयाकडून अनुदानाचे वाटप करण्यात येईल. असे तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती समिती, वाशिम यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे