नागरीकांनो ! पूर परिस्थीतीमध्ये दक्षता घ्या ..जिल्हा प्रशासनाचे आवाहन




नागरीकांनो ! पूर परिस्थीतीमध्ये दक्षता घ्या

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

        वाशिम, दि. 19 (जिमाका) : प्रादेशिक हवामान विभाग, नागपूर यांनी विदर्भात पुढील ७ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट व यलो अलर्ट याप्रमाणे जिल्हानिहाय अनुमान दिले आहे. त्यानुसार वाशिम जिल्हा हा यलो अलर्टमध्ये दर्शविण्यात आला आहे. जिल्हयातील नागरीकांनी यलो अलर्टची सूचना लक्षात घेता पुढील ७ दिवस जिल्हयात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास होणाऱ्या पावासाचा अंदाज घेऊनच कामकाजाचे नियोजन करावे. नदी- नाल्यांना पूर आल्यास त्याठिकाणाहून व पुलावरुन रस्ता ओलांडू नये. तसेच नागरीकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी-नाल्याच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे.

            पूर परिस्थतीमध्ये काय करावे पूर परिस्थीतीत उंच ठिकाणी जावे. विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. गावात/घरात जंतुनाशके असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पूरासंदर्भात पूर्वकल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान व महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी घेवून जावी.

            पूरपरिस्थीमध्ये काय करु नये पूर असलेल्या भागात विनाकारण भटकू नये. पुराच्या पाण्यात चूकुनही जावू नये. दुषित व उघडयावरचे अन्न व पाण्याचे सेवन करणे टाळावे. पुलावरुन पाणी वाहत असतांना पूल ओलांडू नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.   

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे