विधी सेवा प्राधिकरण जागतिक न्याय दिन उत्साहात साजरा
- Get link
- X
- Other Apps
विधी सेवा प्राधिकरण
जागतिक न्याय दिन उत्साहात साजरा
वाशिम, दि. 19 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने १७ जुलै या जागतिक न्याय दिनानिमित्त जुनी आययुडीपी कॉलनी येथील नगर परिषद शिव विद्या मंदिर अभ्यासिकेत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विजय टेकवानी होते .यावेळी मुख्यलोक अभिरक्षक ॲड.परमेश्वर शेळके, वाशिम नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक व्ही.एल. पाटील व सभा अधिक्षक उज्वल देशमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी ॲड.श्री. शेळके यांनी प्रस्ताविकातून अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याची माहिती दिली. श्री. टेकवानी यावेळी म्हणाले, माणूस स्वतःच्या अधिकारांबाबत जागरुक असतो, पण इतरांनासुध्दा अधिकार आहेत ते जाणून घेत नाही. आजघडीला घटस्फोटांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. कोर्टातील खटले वाढत आहेत, त्याकरीता अशाप्रकारच्या कार्यक्रमातून लोकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जागरुक केले जात आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर फोकस करून चांगले अधिकारी बनून देश सेवा करावी.असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे संचालन विधी स्वयंसेवक सुशील भिमजियाणी यांनी केले. उपस्थितांचे आभार उज्वल देशमुख यांनी मानले. यशस्वीतेसाठी विधी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment