शासन आपल्या दारी मंगरूळपीर येथे 76 हजार लाभार्थ्यांना लाभाचे वितरण





शासन आपल्या दारी

मंगरूळपीर येथे 76 हजार लाभार्थ्यांना लाभाचे वितरण

        वाशिम, दि. 14 (जिमाका) : शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत मंगरुळपीर येथील सांस्कृतिक सभागृहात 13 जुलै रोजी आयोजित शिबिरात 76 हजार 743 लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे, प्रमाणपत्राचे व दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भावनाताई गवळी होत्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मंगरुळपीर पंचायत समिती सभापती रेखा भगत, उपसभापती श्री. राठोड, मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, निखील मलिक, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

           कार्यक्रमात लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. थेट शासकीय योजनांचा लाभ देण्याकरीता मंगरुळपीर तालुक्यातील १६ शासकीय कार्यालयाचे अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते. शिबीरात तहसिल कार्यालयाचे- १०७, लघु पाटबंधारे विभाग- ६, नगर परिषद- २४६, तालुका आरोग्य अधिकारी- ११, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी- ११, वनपरिक्षेत्र अधिकारी- २, दुय्यम निबंधक- १, बचतगट -३, उमेद- २३, तालुका कृषी अधिकारी यांचे कडून- ५ ट्रॅक्टर व ४०० मिनी कीट असे एकूण ८१५ लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले.

            शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत मंगरुळपीर तालुक्यात १४ जून ते १८ जून २०२३ या कालावधीत हर घर दस्तक या उपक्रमाअंतर्गत तलाठी, कृषी सेवक व ग्रामसेवक यांच्यामार्फत घरोघरी भेटी देऊन तालुक्यातील ११७ गावात व नगर परिषद क्षेत्रात नगर परिषदेच्या वतीने मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत शहरी भागात ४ हजार २०० व ग्रामीण भागात ९ हजार ३४५ असे एकूण १३ हजार ५४५ कुटुंबांना भेटी देऊन या कुटुंबांना आवश्यक असलेले विविध प्रकारचे ८ हजार ५०० दाखले वाटप करण्यात आले. तसेच महसुल मंडळ मुख्यालयी ६ ठिकाणी विशेष शिबीरे घेऊन त्याठिकाणी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

         १४ एप्रिल २०२३ ते १२ जुलै २०२३ पर्यंत तहसिल विभागातून एकूण ३० हजार ९४२ लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले, संजय गांधी योजनेचे लाभ व मतदार कार्डचे वाटप करण्यात आले. गट विकास अधिकारी पंचायत समिती, मंगरुळपीर यांचेकडून ३७ हजार ९९९ व कृषी विभागाकडून ८ हजार ६०० लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात आले. असे एकूण ७६ हजार ७४३ लाभार्थ्यांना शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत लाभाचे वितरण करण्यात आले.  प्रास्तावित प्रभारी तहसिलदार रविंद्र राठोड यांनी केले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे