वित्त आणि विकास महामंडळ कर्ज योजना कर्जासाठी अर्ज मागविले





वित्त आणि विकास महामंडळ कर्ज योजना

कर्जासाठी अर्ज मागविले

        वाशिम, दि. 20 (जिमाका) : इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी कर्ज योजना राबवित आहे. महामंडाळाच्या या योजनेचे उदिष्ट पुढीलप्रमाणे. २० टक्के बीज भांडवल योजना- या योजनेची कर्ज मर्यादा ५ लक्ष रुपये बँकेचा सहभाग ७५ टक्के, महामंडळाचा सहभाग २० टक्के व लाभार्थ्यांचा सहभाग ५ टक्के आहे. या रक्कमेचा परतफेडीचा कालावधी ५ वर्षाचा आहे. प्रकल्प रक्कम २ लक्ष ५० हजार रुपयापर्यंत आहे. भौतिक उदिष्ट २३ आणि आर्थिक ९.२० पर्यंत आहे. थेट कर्ज योजनाची कर्ज मर्यादा १ लक्ष रुपये आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी ४ वर्ष आहे. प्रकल्प रक्कम १ लक्ष रुपयापर्यंत असून भौतिक उद्दीष्ट ११० आणि आर्थिक ११० आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना - (ऑनलाईन) या योजनेची कर्ज मर्यादा १० लक्ष रुपये आहे. प्रकल्प रक्कम १० लक्ष रुपये असून भौतिक उदिष्ट १२२ आणि आर्थिक १३५.६५ पर्यंत आहे. गट कर्ज व्याज परतावा योजना (ऑनलाईन) आहे. यासाठी कर्ज मर्यादा ५० लक्ष रुपये आहे. प्रकल्प रक्कम रु ५० लक्ष रुपये असून भौतिक उदिष्ट १३ आणि आर्थिक ७०.८५ पर्यत आहे. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना - (ऑनलाईन) यासाठी कर्ज मर्यादा २० लक्ष रुपये आहे. प्रकल्प रक्कम २० लक्ष रुपये असून भौतिक उदिष्ट ११ आणि आर्थिक १६.५० पर्यंत आहे. कौशल्य प्रशिक्षण विकास योजनेसाठी भौतिक उदिष्ट ३३३ असून आर्थिक ५६ पर्यंत आहे. महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजनेचे भौतिक उदिष्ट १४ हजार ४४४ आहे. यासाठी आर्थिक उदिष्ट १९५ पर्यंत आहे.

        या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे लाभार्थ्यांची पात्रता असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे वय १८ ते ५० असावे. उत्पन्नाच्या दाखल्यासोबात सक्षम अधिकाऱ्याने प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती, जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो. व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र/ जन्मतारखेचा दाखला. २ जामिनदार हमीपत्र अथवा गहाणखत. स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे. त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे कर्जदाराचे प्रतिज्ञापत्र. तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने/लायसन्स. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल यंत्र सामुग्री इत्यादीचे दरपत्रक आणि महामंडळाच्या संचालक मंडळाने वेळोवेळी निर्देशित केल्यानुसार इतर कागदपत्रांच्या तपशिलासह पात्र व्यक्तींनी www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट दयावी.अधिक माहितीसाठी इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा. असे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे