जि.प.निधीतून पीठ गिरणी योजना दिव्यांगांकडून 21 जुलैपर्यंत अर्ज मागविले




जि.प.निधीतून पीठ गिरणी योजना

दिव्यांगांकडून 21 जुलैपर्यंत अर्ज मागविले

        वाशिम, दि. 18 (जिमाका) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने दिव्यांगांकरीता राखीव ठेवण्यात येत असलेल्या ५ टक्के निधीमधुन ग्रामीण भागातील दिव्यांग गरजूंकरीता पीठ गिरणी ही योजना सन 2023-24 या वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. ज्या दिव्यांगाचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेकरीता समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, वाशिम येथे 21 जुलै 2023 पर्यंत अर्ज करावे. जिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे