पिंपरी (मोडक) शाळेतील विद्यार्थ्यांना दिलीत ंबाखूच्या दुष्परिणामाची माहिती





पिंपरी (मोडक) शाळेतील विद्यार्थ्यांना दिली

तंबाखूच्या दुष्परिणामाची माहिती

        वाशिम, दि. 20 (जिमाका) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत कारंजा तालुक्यातील पिंपरी (मोडक) येथे विघ्नेश्वर उच्च प्राथमिक आश्रमशाळा येथे तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामाची माहिती देण्यात आली. यावेळी मानसशास्त्रज्ञ राम सरकटे यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे मुख कर्करोग, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे विविध आजार व तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.

         सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी आपली शाळा तंबाखूमुक्त करण्याबाबत करावयाच्या उपाययोजना, तंबाखूमुक्त शाळेचे निकष व तंबाखूचे सेवन सोडविण्यासाठी असलेला टोल फ्री क्रमांक 1800112356 याबाबत माहिती दिली. कामरगाव ग्रामीण रुग्णालयाचे एन.सी.डी समुपदेशक गणेश रवणे यांनी तंबाखूजन्य पदार्थापासून विद्यार्थ्यांनी कसे दूर राहावे व इतरांना त्यापासून कसे परावृत्त करावे याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एस.व्ही.मोडक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे