शासकीय वसतीगृह प्रवेश अर्ज वाटप सुरु
शासकीय वसतीगृह प्रवेश अर्ज वाटप सुरु
वाशिम, दि. 05 (जिमाका) : अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्हयातील वाशिम,मंगरुळपीर,कारंजा व सवड येथील 4 मुलांचे वसतीगृह आणि वाशिम व मंगरुळपीर येथील 2 मुलींचे असे एकूण 6 शासकीय वसतीगृहे आहे.शैक्षणिक वर्ष सन 2023-24 करीता ऑफलाईन पध्दतीने प्रवेश देण्याबाबत प्रक्रीया सुरु आहे.या वसतीगृहस्तरावर प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध आहे.प्रवेश अर्ज वाटप सुरु आहे.वसतीगृह प्रवेशाचा गरजू व इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment