प्रधानमंत्री पिक विमा योजना : ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
प्रधानमंत्री पिक विमा योजना
३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
वाशिम,दि.३१ (जिमाका) जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना २६ जुन २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ करीता लागु करण्यात आली आहे.या योजनेतंर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी १ रुपयात पिक विमा काढुन ३१ जुलै २०२३ या अंतिम मुदतीत सहभाग नोंदवू शकणार होते. परंतू ३१ जुलै अखेर जिल्हकयातील काही शेतकरी पिक विमा काढु शकले नाहीत.एकंदरीत जास्तीत जास्तक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग नोंदविता यावा,याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ करीता पिक विमा काढण्यासाठी ३ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
पिक विमा योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरीता ७/१२ किंवा ८अ, आधार कार्ड, पिक पेराबाबत स्वकयं घोषणापत्र व बॅंक पासबुकची प्रत आदी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.पिक विम्याचे अर्ज शेतकरी स्वतः, सामाईक सुविधा केंद्र (सीएससी), बॅंका आणि विमा कंपनी प्रतिनिधी यांचेकडे करु शकतात.तरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आरीफ शहा यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment