45 हजार हेक्टरवरील शेतपीक बाधित पावसाने खरडून गेले 1750 हेक्टर क्षेत्र
- Get link
- X
- Other Apps
45 हजार हेक्टरवरील शेतपीक बाधित
पावसाने खरडून गेले 1750 हेक्टर क्षेत्र
वाशिम, दि. 24 (जिमाका) : जिल्हयात 5 जुलै ते 22 जुलै या कालावधीत झालेल्या पावसामुळे 45 हजार 874.38 हेक्टर शेतपिकाचे क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. 5 जुलै रोजी कारंजा तालुक्यातील येवता मंडळातील 2 हेक्टरवरील कपाशी व सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. 12 जुलै रोजी कारंजा तालुक्यातील येवता व उंबर्डा (बाजार) महसूल मंडळातील 36 हेक्टरवरील कपाशी, तूर व सोयाबीन पीक, 14 ते 16 जुलै दरम्यान मानोरा तालुक्यातील इंझोरी मंडळातील 111 हेक्टरवरील आणि मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी (ताड) मंडळातील 340 हेक्टरवरील कपाशी, तूर व सोयाबीनचे, 18 जुलै रोजी कारंजा तालुक्यातील खेर्डा (बु.) व पोहा मंडळातील 4 हजार 311 हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद व मुंग व मंगरुळपीर मंडळातील 1 हजार 463 हेक्टरवरील सोयाबीन व तूर, 19 जुलै रोजी कारंजा मंडळातील 335.5 हेक्टरवरील कपाशी, तूर व सोयाबीन आणि मालेगांव तालुक्यातील वाडी रामराव व पिंपळशेंडा मंडळातील 45 हेक्टरवरील सोयाबीन व तूर पिकाचे नुकसान झाले.
20 जुलै रोजी मालेगांव तालुक्यातील किन्हीराजा मंडळातील 60 हेक्टरवरील सोयाबीन व तूर आणि 22 जुलै रोजी मानोरा तालुक्यातील मानोरा, इंझोरी, शेंदूर्जना, कुपटा, गिरोली व उमरी (बु.) मंडळातील 15 हजार 295.88 हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद व मुंग आणि कारंजा तालुक्यातील पोहा, धनज (बु.), कामरगाव, हिवरा (लाहे) व येवता मंडळातील 23 हजार 875 हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी, उडीद व मुंग पिकांचे पावसाने बाधित होवून नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे 16 जुलै रोजी मालेगांव तालुक्यातील 5.3 हेक्टर, 18 जुलै रोजी कारंजा तालुक्यातील खेर्डा (बु.) व पोहा मंडळातील 13.8 हेक्टर आणि 22 जुलै रोजी मानोरा तालुक्यातील मानोरा, इंझोरी, शेंदुर्जना, कुपटा, गिरोली व उमरी (बु.) या मंडळातील 1750.3 हेक्टर अशी एकूण 1769.4 हेक्टर जमीन खरडून गेली.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment