वर्तुळाकार अर्थव्यवस्था अभियान - २०२३...९ वा शालेय जागृती कार्यक्रम


वर्तुळाकार अर्थव्यवस्था अभियान - २०२३

९ वा शालेय जागृती कार्यक्रम

वाशिम,२८(जिमाका) खाण मंत्रालय आणि पोलाद मंत्रालय जेएनएआरडीडीसी,नागपूर आणि नाल्को,एनएमडीसी आणि एमएसटीसी आणि एमआरएआय यांच्या सहकार्याने वर्तुळाकार अर्थव्यवस्था मोहिमेची मालिका आयोजित करीत आहे. सन २०२३ हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या स्मरणार्थ आझादी का अमृत महोत्सव (AKAM) अंतर्गत पर्यावरणासाठी टिकाऊपणा/जीवनशैली (LiFE) वर आधारित आहे.
         मेटल क्षेत्रातील वर्तुळाकार अर्थव्यवस्थेबद्दल जागरूकता आणण्यासाठी,जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट आणि डिझाइन सेंटर विदर्भातील ११ जिल्ह्यांतील २२ ULB शाळांमध्ये जागृती कार्यक्रम आयोजित करत आहे.त्याचाच एक भाग म्हणून ९ वा कार्यक्रम आज वाशिम येथील नियोजन भवनातील सभागृहात संपन्न झाला.राणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल व जि.प. हायस्कूल,मंगरुळपीर येथील विद्यार्थिनींनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
              कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांच्याहस्ते झाले.यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बारसू,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, शिक्षणाधिकारी राजेश शिंदे, शिक्षणाधिकारी (योजना) गजानन डाबेराव, विस्तार अधिकारी (शिक्षण ) विश्वनाथ भालेराव,भाऊराव भालेराव, कार्यक्रम अधिकारी मंगेश गवई, वैज्ञानिक डॉ.उपेंद्र सिंग,डॉ.प्रविण भुकटे,आयोजक आर.विशाखा आदी मान्यवर उपस्थित होते. 
          जिल्हाधिकार्‍यांनी हवामान बदलाच्या समस्येवर उपाय म्हणून संसाधनांची कार्यक्षमता वाढवणे आणि पुनर्वापर केलेल्या सामग्रीच्या वापरास प्रोत्साहन देण्याची गरज स्पष्ट केली.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल्सचे त्यांनी कौतुक केले. 
                 डॉ उपेंद्र सिंग आणि जेएनएआरडीडीसीचे डॉ.पी जी भुकटे यांनी मेटल रिसायकलिंग आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर संक्षिप्त सादरीकरण केले.उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे यांनी या दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले.त्यांनी उत्कृष्ट आउट ऑफ वेस्ट स्पर्धेत उल्लेखनीय रेखाचित्रे आणि मॉडेल्सचे प्रदर्शन केले. 
         सुमारे २५० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आणि सर्वोत्कृष्ट पाच प्रदर्शन आणि रेखाचित्रांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. 
          कार्यक्रमाचे संचालन श्रीमती आर विशाखा,वरिष्ठ प्रशासकीय कार्यालय यांनी केले.श्रीमती विशाखा यांनी आपल्या भाषणात रिसायकलिंगचे महत्त्व देखील स्पष्ट केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे