कोतवाल पदभरती : पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करा उपविभागीय अधिकारी यांचे आवाहन




कोतवाल पदभरती : पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करा

उपविभागीय अधिकारी यांचे आवाहन

        वाशिम, दि. 18 (जिमाका) : तहसिल कार्यालय,मंगरुळपीरअंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्राकरीता उपविभागीय अधिकारी मंगरुळपीर यांच्या अध्यक्षतेखाली कोतवाल पदभरती-२०२३ ची प्रक्रिया सुरु आहे. कोतवाल पदभरती- २०२३ करीता भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यात येत आहे. या पदभरती संदर्भात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडून कोणीही कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण घेवाण करु नये. तसेच अपप्रचार करणाऱ्या व्यक्तीना समर्थन करु नये. मंगरुळपीर उपविभागातील कोतवाल पदभरती- २०२३ची प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी, मंगरुळपीर यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे