निर्यात बंधु योजना 1 ऑगस्टला कार्यशाळा
निर्यात बंधु योजना
1 ऑगस्टला कार्यशाळा
वाशिम,दि.31(जिमाका) जिल्हयातील उद्योजक,निर्यातदार, फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या निर्यात क्षमता वृध्दीसाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने निर्यात बंधु योजनेअंतर्गत एक दिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन 1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन सभागृह,नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. यावेळी डीजीएफटीच्या अतिरिक्त महासंचालक स्नेहल ढोके यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यशाळेत निर्यात बंधु, आत्मनिर्भर भारत,व्होकल फॉर लोकल आणि मेक इन इंडिया, आयईसी रजिस्ट्रेशन,कस्टम प्रोसिजर, एमएसएमई योजना आणि ई-कॉमर्स याबाबत सविस्तर व्हिडिओ सादरीकरण करण्यात येणार आहे. तरी या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व निर्यातदार, फार्मर प्रोड्युसर कंपनी, सर्व औद्योगिक संघटना, निर्यात इच्छुक उद्योजक, नवउद्योजकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खंबायत यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment