रास्त भाव दुकानाकरीता 5 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले
- Get link
- X
- Other Apps
रास्त भाव दुकानाकरीता
5 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले
वाशिम, दि. 13 (जिमाका) : जिल्हयात रिक्त असलेल्या रास्त भाव दुकाने परवाना मंजूरीकरीता संबंधित गावात जाहिरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे. जिल्हयातील 28 गावात रिक्त असलेल्या ठिकाणी रास्त भाव दुकाने सुरु करण्याकरीता 20 जुलै ते 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत इच्छुकांकडून संबंधित तहसिल कार्यालयामार्फत विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.
रिक्त असलेल्या रास्त भाव दुकाने तालुका व गाव/ वार्डनिहाय पुढील प्रमाणे. वाशिम तालुका- काटा भाग-2, कानडी, कामठवाडा, घोटा, धारकाटा व कुंभारखेडा. मालेगांव तालुका- मालेगाव शहर (गांधीनगर), पांगरखेड, वरदरी (खु.), कुरळा व झोडगा (खु.). रिसोड तालुका- कोयाळी खु. (केनवड) व तपोवन. मंगरुळपीर तालुका- एकांबा व स्वाशिन, कारंजा तालुका- कारंजा वार्ड क्र. 21, कारंजा वार्ड क्र. 4, वढवी, वडगांव (रंगे), पिंपळगांव (खु). व धोत्रा जहाँगीर. मानोरा तालुका- जामदरा घोटी, पाळोदी भाग- 1, आसोला (खु.), बोरव्हा, चाकुर, वार्डा व जवळा (खु.) अशा एकूण 28 गावात व वार्डात रिक्त असलेल्या रास्त भाव दुकानाकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.
28 नवीन रास्त भाव दुकान परवाने हे खालील प्राधान्य क्रमानुसार मंजूर करण्यात येणार आहे. यामध्ये पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयं सहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था व महिला स्वयं सहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे यांनी दिली.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment