विधी सेवा प्राधिकरणाकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण व कायदेविषयक जनजागृती
विधी सेवा प्राधिकरणाकडून
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण व कायदेविषयक जनजागृती
वाशिम,दि.26 (जिमाका) 24 जुलै रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वतीने विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विजय टेकवाणी यांच्यामार्गदर्शनात विधी स्वयंसेवकांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती गोळा करून शहरात विविध भागातील लोकांना कायद्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी आनंदवाडी,अकोला नाका,ग्रामीण पोलीस स्टेशन समोर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर,पाटणी चौक,भिमनगर,चामुंडा देवी, निमजगा,संत ज्ञानेश्वरनगर व वाल्मिकनगर या भागात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात आली. यावेळी एकही बालक शाळाबाह्य आढळले नाही तसेच यावेळी विधी स्वयंसेवकांनी कायदेविषयक माहितीपत्रके वितरीत केली.
शाहीर उत्तम इंगोले यांनी आपल्या भारदस्त आवाजात जनजागृती गाणे म्हणूण जनजागृती केली.या संपूर्ण उपक्रमासाठी विधी स्वयंसेवक सुशील भिमजियाणी, जगदीश मानवतकर, राजकुमार पडघाण,माधव डोंगरदिवे,शाहीर उत्तम इंगोले, मनीषा दाभाडे,उषा वानखेडे, शीतल बन्सोड,मेघा दळवी,उत्तम धाबे,शिवाजी चाबुकस्वार व गणेश पंडित यांनी परिश्रम घेतले.
*******
Comments
Post a Comment