Posts

Showing posts from April, 2020

खरीप हंगामात दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्या - पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
·              खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा ·              शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या बियाणांची उगवण क्षमता तपासा ·              बोगस बियाणे, कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा ·              पीक कर्ज वितरण उद्दिष्ट गाठण्यासाठी योग्य नियोजनाच्या सूचना वाशिम ,   दि. २५ (जिमाका) :   जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अवेळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने आगामी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना पुरेसे घरगुती बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कृषि विभागाने योग्य नियोजन करून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आवश्यक पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचे आज, २५ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे हे अकोला येथून या बैठकीत सहभागी झाले होते. वाशिम येथून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार

कारखेड्याच्या पखमोडे दांपत्याने केला लॉकडाऊनचा सदुपयोग

Image
·         ‘लॉकडाऊन’मध्ये केलं ‘ड्रील डाऊन’ ·         २१ दिवसात खोदली २५ फुट खोल विहीर वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कारखेडा हे सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव. मानोरा-दिग्रस रोडवरील विठोली येथून पूर्वेकडे ३ किलोमीटर अंतरावर वसलेलं हे गाव सध्या चर्चेत आलं आहे ते येथील पुष्पा व गजानन पखमोडे दांपत्याने केलेल्या एका अनोख्या कामगिरीमुळे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुका हा तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पाणीटंचाईची समस्या ही प्रत्येक उन्हाळ्यात प्रखरतेने जाणवते. त्यामुळे पाण्याचे मोल इथं सर्वांनाच समजते. पुष्पा आणि गजानन यांनी सुद्धा हे मोल लक्षात घेवून पाण्याच्या समस्येवर मात करणारी एक अनोखी व इतरांना आदर्शवत कामगारी करून दाखविली आहे. ‘लॉकडाऊन’च्या २१ दिवसांत या पती-पत्नीने स्वतः खोदकाम करून अंगणात २५ फुट विहीर खोदण्याची कामगिरी करून दाखवली आहे.   ‘लाथ मारील तिथं पाणी काढील’ या आत्मविश्वासाने आणि जिद्दीने त्यांनी केलेले काम सर्वांसमोर आदर्श निर्माण करणारे आणि प्रेरणादायी तर आहेच पण वेळेचा सदुपयोग कसा करावा, हे सुद्धा शिकविणारे आहे.   गजानन पखमोडे यांचे

वाशिम जिल्ह्यात संचारबंदीचे सुधारित आदेश लागू

Image
·         लॉकडाऊन काळात काही सेवांना मुभा ·         आदेशात नमूद आस्थापना, दुकाने सुरु करण्यास परवानगी, पासेस आवश्यक ·         आदेशात नमूद नसलेली दुकाने, आस्थापना सुरु केल्यास कारवाई वाशिम ,   दि. २० (जिमाका) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा कालावधी सुद्धा ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र, यामधून २० एप्रिल पासून काही आवश्यक व्यवसाय, उद्योग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे सुधारित आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २० एप्रिल २०२० रोजी जारी केले. सुधारित संचारबंदी आदेशात नमूद करण्यात आलेल्या सेवा, आस्थापना, दुकाने सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्राधिकृत केलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी व पासेस घेणे आवश्यक आहे. या सुधारित आदेशात नमूद केलेली दुकाने, आस्थापना, कामे, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व सेवा आणि या आदेशानुसार परवानगी दिलेल्या इतर बाबी वगळता कोणत्याही आस्थापना, दुकाने, कामे सुरु करता ये

संचारबंदी काळातील उपाययोजनांविषयी सुधारित आदेश; एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित

Image
·         २० एप्रिलपासून होणार अंमलबजावणी ·         प्रतिष्ठाने सुरु करण्यापूर्वी ‘एसओपी’ सादर करणे बंधनकारक वाशिम ,   दि. १९ (जिमाका) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा कालावधी सुद्धा ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी सुधारित आदेश १८ एप्रिल २०२० रोजी निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे असून त्यांची अंमलबजावणी २० एप्रिल २०२० पासून केली जाणार आहे. ३ मे २०२० पर्यंत खालील सेवा प्रतिबंधित राहणार आहेत - - सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वेमधून सर्व प्रवाशी वाहतूक बंद राहील. - सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या बसेस बंद राहतील. - वैद्यकीय कारणाशिवाय किंवा मार्गदर्शक सूचनानुसार परवानगी असलेल्या व्यक्ती वगळून इतर व्यक्तींच्या अंतरजिल्हा व अंतरराज्य हालचालीकरिता बंदी राहील. - सर्व शैक्षणिक प्रश