वाशिम जिल्ह्यातील सर्व बँक सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच सुरु राहणार



·        आदेशाला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ
वाशिम, दि. १३ (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दवाखाने, औषधी दुकाने वगळता सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या कामकाजाची वेळ सुद्धा ८ एप्रिल २०२० पासून सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी ७ एप्रिल रोजी दिले होते. या आदेशाला आता ३० एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात संचारबंदी काळात बँकांना किमान मनुष्यबळासह नियमानुसार सुरु ठेवण्याबाबत २६ मार्च रोजी आदेशित करण्यात आले होते. मात्र, या आदेशात अंशतः बदल करून जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी व खासगी बँका सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिले होते. या आदेशाला मुदतवाढ देण्यात आल्याने ३० एप्रिल २०२० पर्यंत सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी व खासगी बँकांची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच राहणार आहे.
*****


Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर