‘तबलिगी जमात’सारख्या कार्यक्रमात सहभागी नागरिकांनी स्वेच्छेने माहिती सादर करावी
·
जिल्हा
प्रशासनाचे जाहीर आवाहन
·
हेल्पलाईन
क्रमांक जाहीर
वाशिम, दि. ०६ (जिमाका) :
निजामुद्दीन मरकज दिल्ली, हरियानामधील पानिपत जिल्हा, राजस्थान, उत्तर प्रदेश व
देशाच्या इतर भागातील तबलिगी जमातसारख्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या वाशिम
जिल्ह्यातील नागरिकांनी आपली माहिती स्वच्छेने जिल्हा प्रशासनाला कळवावी, असे
आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने
हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले असून माहिती संकलनासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक
करण्यात आली आहे.
कोरोना
विषाणूला प्रतिबंध केल्यास कोविड-१९ या आजारापासून बचाव शक्य आहे. त्यामुळे तबलिगी
जमातसारख्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींनी आपले कुटुंब, आपले
प्रियजन, आपला समाज, आपल्या गावाला कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर
ठेवण्यासाठी पुढाकार घेवून प्रशासनाला सहकार्य करावे. आपणास जिल्हा प्रशासनामार्फत
योग्य ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी म्हटले
आहे.
तसेच
आपण जमात व यासारख्या कार्यक्रमांमध्ये सामील झाल्याची माहिती प्रशासनापासून जाणीवपूर्वक
लपवून ठेवल्यास आपणाविरुद्ध जाणीवपूर्वक कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग केल्याबद्दल
भारतीय दंड विधान १८६० च्या कलम २६९,
२७०, १८८ व ३४ अन्वये कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात
येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असा
इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
हेल्पलाईन क्रमांक जाहीर
देशात
विविध ठिकाणी झालेल्या जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या वाशिम जिल्ह्यातील
नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे (भ्रमणध्वनी क्र. ९८५०५२५३५३) यांच्याशी
संपर्क साधून आपली माहिती द्यावी अथवा ८३७९९२९४१५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क
साधून अथवा व्हॉटसअप संदेशाद्वारे किंवा ०७२५२-२३४२३८ या क्रमांकावर आपले नाव,
संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आदी माहिती सादर करावी. तसेच इतर नागरिकांनाही
याबाबत काही माहिती त्यांनी वरील क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे
आवाहन करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment