दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर



·        नोडल अधिकारी नियुक्त
वाशिम, दि. ०१ : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत दिव्यांग बांधवांना काही मदत हवी असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील ०७२५२-२३४२३८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात संचारबंदी काळात हालचाल करू न शकणाऱ्या दिव्यांग बांधवांना आपत्कालीन समयी सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर (भ्रमणध्वनी क्र. ९९७०९३६७९९) यांची जिल्हास्तरावर नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश