जीवनावश्यक वस्तूंची विक्री आता सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच सुरु राहणार



वाशिम, दि. ०१ : जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात लोकांची गर्दी टाळण्यासाठी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरु ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ नंतर दवाखाने, औषधी विक्री केंद्र वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना, पेट्रोलपंप बंद ठेवण्यात येतील, असे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी, आज १ एप्रिल रोजी दिले आहेत.
कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. एकाच ठिकाणी होणारी लोकांची गर्दी टाळणे हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकमेव प्रभावी उपाय आहे. संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व अन्नधान्य, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे या जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने व पेट्रोलपंप सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, औषध विक्री करणारी दुकाने, सर्व हॉस्पिटल नियमिपणे सुरु राहतील.
पुढील १४ दिवस महत्वाचे, सूचनांचे पालन करा : जिल्हाधिकारी
कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी कर्फ्यू लावण्यात आला आहे. ‘कोरोना’ला रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये हे १४ दिवस अतिशय महत्वाचे आहेत. या कालावधीत प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळावी, विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रशासनामार्फत देण्यात येत असलेल्या सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी सुद्धा आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी, एकत्र येणे टाळावे. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळूनच रांगेत उभे रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश