चेहऱ्यावर मास्क न लावल्यास २०० रुपये दंड
·
जिल्हाधिकारी
हृषीकेश मोडक यांचे आदेश
वाशिम, दि. १३ (जिमाका) :
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून आता चेहऱ्यावर मास्क न लावता शहरात
फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
यांनी दिले आहेत. मास्क नसल्यास रुमाल, गमछा चेहऱ्यावर बांधणे आवश्यक आहे.
कोरोना
विषाणू संसर्गामुळे राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या संसार्गावर
नियंत्रण आणण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ मधील खंड २, ३ व ४
ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम अन्वये निर्गमित
करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
वाशिम जिल्ह्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून
वाशिम जिल्ह्यात चेहऱ्यावर मास्क, रुमाल अथवा गमछा न बांधता शहरात सार्वजनिक
ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांकडून एकरकमी २०० रुपये दंड वसूल करण्याचे आदेश
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दंड
वसूल केल्यानंतर संबंधिताला पावती द्यावी. तसेच एकाच नागरिकावर एकापेक्षा जास्त
वेळा दंडाची रक्कम आकारण्यात आल्यास, अशा नागरिकाला शहरामध्ये फिरण्यास मज्जाव
करून कलम १८८ अन्वये कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी पोलीस
प्रशासनाला दिल्या आहेत.
*****
Comments
Post a Comment