Posts

Showing posts from April, 2023

पोलीस कवायत मैदान येथेमहाराष्ट्र दिनाचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरामुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
पोलीस कवायत मैदान येथे महाराष्ट्र दिनाचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते ध्वजारोहण वाशिम दि.०१ मे (जिमाका) महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे उत्साहात संपन्न झाला.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह,सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नु पी.एम.अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे,जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले,राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अभिनव बालुरे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विजय काळबांडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत झाले.श्रीमती पंत यांनी परेडचे निरीक्षण केले.वाशिम पोलीस दलाचे पुरुष व महिला पथक,गृहरक्षक दलाचे पुरुष व महिला पथक,पोलीस बँण्ड पथक दल आदी परेडमध्ये सहभागी झाले होते. परेडमध्ये सहभागी पथकांनी रा

माविमचे उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी सन्मानित

Image
माविमचे उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी सन्मानित   वाशिम दि.२९(जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळ,माविम महिला प्रांगण येथे नुकतेच नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्द्म विकास प्रकल्पामध्ये आयोजित सन २०२३-२०२४ चे कार्यनियोजन व २०२२-२०२३ मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,आय.सी.सी.आय बँकेचे विभागीय अधिकारी सुहास बोबडे व जिल्हा प्रतिनिधी प्रदीप सांभारे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख कल्पना लोहकपुरे सहायक सनियंत्रण अधिकारी कल्पना लोहकपूरे व कार्यक्रम अधिकारी प्रांजली वसाके यांची उपस्थिती होती.                  श्री.पवार म्हणाले,जिल्हयात प्रत्येक गटातील महिलांना व्यवसायाच्या प्रवाहात आणणे व त्याकरीता विविध कार्यक्रमाची सांगड घालावी.बँकाचे याकरीता अधिक सहकार्य अपेक्षित आहे. महिलांचे व

महाराष्ट्र स्थापना दिनीप्लास्टिक ध्वजाच्या विक्री व वापरास मनाई

Image
महाराष्ट्र स्थापना दिनी प्लास्टिक ध्वजाच्या विक्री व वापरास मनाई वाशिम, दि.२८(जिमाका) महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी लहान आकारातील कागदी व प्लास्टिक राष्ट्रध्वजांची विक्री मोठया प्रमाणात केली जाते.शालेय विद्यार्थी व लहान मुले यांच्यासह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी राष्ट्रध्वज विकत घेतात व त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकून देतात.त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.काहीवेळा तसेच विशेष कला व क्रीडा प्रसंगी वैयक्तिकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज फेकले जातात.रस्त्यात विखुरलेले राष्ट्रध्वज जर प्लास्टिकचे असतील तर प्लास्टिक बरेच दिवस नष्ट होत नाही.त्यामुळे बरेच दिवस त्याच ठिकाणी पडून असतात. राष्ट्रहिताचे दृष्टीने ही गंभीर बाब आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, त्याअनुषंगाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री व वापर कोणीही करु नये.            राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशातील प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे.राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना करणे दंडनीय अपराध आहे.वापरास उपयुक्त नसलेले, फाटलेले व जीर्ण झालेले किंवा माती लागलेले,रस्त्यावर किंवा

दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिर २ मे - वाशिम,३ मे -मंगरुळपीर, ४ मे - मानोरा, ५ मे -कारंजा

Image
दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिर  २ मे - वाशिम,३ मे -मंगरुळपीर,  ४ मे - मानोरा, ५ मे -कारंजा वाशिम,दि.२८ (जिमाका) दिव्यांग सशक्तीकरण विभाग,सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार यांच्या एडीप योजनेंतर्गत वाशिम- यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण करण्यासाठी २ मे ते ५ मे २०२३ या कालावधीत तालुकानिहाय शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.       वाशिम तालुक्यासाठी २ मे रोजी जिल्हा परिषद शाळा,जूनी जि.प. जवळ, सकाळी ८ ते दुपारी १२,व दुपारी ४ ते सायं ७ वाजतापर्यंत दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी श्री.तोतेवाड यांची शिबीर प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९७३०९३९८४० आहे.          मंगरूळपीर तालुक्यासाठी ३ मे रोजी जि.प हायस्कूल,अकोला चौक, मंगरूळपीर येथे सकाळी ८ ते दुपारी १२ ,व दुपारी ४ ते सायं ७ वाजतापर्यंत दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.गटविकास अधिकारी के.व्ही.घुगे य

३ मे रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

Image
३ मे रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा वाशिम,दि.२८ (जिमाका) कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत नोकरी ईच्छ्क युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दुष्टीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. रोजगार इच्छ्क उमेदवारांना विविध क्षेत्रांत निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हयात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्या वतीने ३ मे रोजी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तळमजला,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,वाशिम येथे रोजगार मेळावा आयोजित केला आहे.          मेळाव्यात राज्यातील नामांकीत उद्योजक प्रतिनिधी उपस्थित राहन मुलाखताद्वार नोकरी इच्छूक उमेदवाराना रोजगार देण्यासाठी सहभागी होत आहे.ज्या रोजगार ईच्छ्क उमेदवारांचे किमान १० वी,१२ वी,आय.टी.आय. (इलेक्टॉनिक्स ट्रेड),पदवीधर (कला वाणिज्य विज्ञान इंजिनिअरिंग)  शैक्षणीक पात्रता असून १८ ते ४५ वयोगटातील आहेत.अशा युवक-युवती उमेदवारांच्या मुलाखती घेऊन विविध प्रकारच्या पदनामांकरीता ७० पेक्षा जास

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार

Image
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार   वाशिम दि २8(जिमाका) शेतीच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी धरणांमध्ये साचलेला गाळाचा उपसा करुन तो शेतात पसरविणे उपयुक्त आहे. धरणातील गाळाचा उपसा केल्याने धरणांची मुळ साठवण क्षमता पुन:र्स्थापित होण्यास मदत होते. जलस्त्रोतांमध्ये गाळ साठणे ही क्रीया कायमस्वरुपी आहे. महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक धरणे व जलसाठे असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. दरवर्षी धरणात साचत चाललेल्या गाळामुळे धरणातील पाणी साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. धरणातील गाळ काढून तो शेतीत टाकल्यास शेतीची उत्पादकता तर वाढण्यास मदत होणार आहेच सोबतच धरणांच्या पाणी साठवण क्षमतेत देखील वाढ होणार आहे. ही बाब ओळखून राज्य शासनाने 20 एप्रिल 2023 रोजी निर्णय घेवून राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना सुरु केली आहे.         यंदा अल निनोमुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता लक्षात घेता तसेच राज्यातील जलसाठ्यांमध्ये जवळपास 44 कोटी घनमीटर गाळ आहे “गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार ” या योजनेचे महत्व लक्षात घेता यावर्षीपासून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. शासनाकडून यंत्रस

आठ गावात सुरू होणार ग्रामीण कौशल्य विकास केंद्र

Image
आठ गावात सुरू होणार  ग्रामीण कौशल्य विकास केंद्र  वाशिम दि.२८(जिमाका) ग्रामीण भागातील युवक - युवतींना रोजगारक्षम बनवून बेरोजगाराच्या जटील समस्येचा सामना करण्यासाठी त्यांना कौशल्य,उद्योजकता व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतीमध्ये प्रायोगिक तत्वावर ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे.यामध्ये वाशिम तालुक्यातील अनसिंग आणि काटा, मंगरूळपीर तालुका - शेलू (खुर्द) आणि सोनखास,मानोरा तालुका - पोहरादेवी आणि शेंदुर्जना (आढाव) आणि रिसोड तालुका - रिठद आणि वाकद येथे ही केंद्र सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते आभासी पद्धतीने वाशीम येथील आकाशवाणी रिले केंद्राचे उद्घाटन सर्वसामान्यांना योजनांसह विविध माहिती मिळण्यास मदत होणार खासदार भावना गवळी

Image
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते आभासी पद्धतीने वाशीम येथील आकाशवाणी रिले केंद्राचे उद्घाटन   सर्वसामान्यांना योजनांसह विविध माहिती मिळण्यास मदत होणार                 खासदार भावना गवळी वाशिम दि.२८(जिमाका) आकाशवाणीच्या या रिले केंद्राची रेंज संपूर्ण जिल्ह्यात मिळाली पाहिजे. कमी अंतर संपविले पाहिजे. आकाशवाणीच्या माध्यमातून शेतकरी,युवक,महिला व सर्वांनाच आकाशवाणीवरून वेगवेगळ्या योजनांच्या माहितीसह इतरही माहिती मिळण्यास मदत होणार आहे.असे प्रतिपादन खासदार भावना गवळी यांनी केले.    आकाशवाणी‌ मुंबई केंद्राच्या विविध भारतीचे कार्यक्रम वाशीम जिल्ह्यातील श्रोत्यांना व्यवस्थित ऐकायला मिळावे. यासाठी वाशीम येथील दूरदर्शनच्या पुर्व लघु प्रक्षेपण केंद्राच्या परिसरात आकाशवाणीचे एफ.एम.ट्रान्समीटर (100 वॅट) प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले.या रिले केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने आज उद्घाटन करण्यात आले.वाशिम येथे आयोजित कार्यक्रमाला खासदार भावना गवळी,आमदार ऍड.किरणराव सरनाईक,आमदार लखन मलिक, माजी आमदार ऍड.,विजय जाधव, सहायक जिल्हाधिकारी

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ३० एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी

Image
रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ३० एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी वाशिम दि.२८ (जिमाका) कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोडच्या संचालक मंडळाच्या सन २०२३ -२८ या कालावधीच्या निवडणुकीकरिता मतदान ३० एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजतापासून सुरू होईल.ही मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय,प्रशासकीय इमारत,तळ मजला,गाळा क्र.१०४ रिसोड येथे होणार आहे.          या निवडणुकीकरिता 1- रिसोड मतदान केंद्रावर सेवा सहकारी संस्था मतदारसंघासाठी तहसिल कार्यालय,रिसोड येथे मतदान केंद्र राहणार असून या मतदान केंद्रावर रिसोड,कंकरवाडी,चिचंबाभर,लिंगा, कोतवाल,खडकी,सदार,देगाव, वाडीरायताळ,मोहोजा (इंगोले),सेलु (खडसे),गणेशपूर,करडा, भोकरखेडा,हराळ,किनखेडा, मोठेगाव,एकलासपूर धोडप (बु) व भापुर येथील सेवा सहकारी संस्थेचे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.         2-रिसोड या केंद्रावर ग्रामपंचायत मतदारसंघासाठी तहसिल कार्यालय रिसोड येथे कंकरवाडी, चिंचाबाभर,लिंगा,कोतवाल,खडकी सदार,देगाव,वाडीरायताळ,मोहोजा (इंगोले),सेलु (खडसे), गणेशपुर (रि), करडा,घोन्सर,निजामपूर,

सूचनांचे पालन न करणाऱ्या कृषी केंद्रावर होणार कारवाई षन्मुगराजन एस.कृषि निविष्ठा सनियंत्रण समिती सभा

Image
सूचनांचे पालन न करणाऱ्या कृषी केंद्रावर होणार कारवाई                              षन्मुगराजन एस. कृषि निविष्ठा सनियंत्रण समिती सभा          वाशिम, दि. 27 (जिमाका) : जिल्हयात येत्या खरीप हंगामात खताची कमतरता जाणवणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी. कृषी केंद्रांनी कोणत्याही कंपनीच्या खतांची साठेबाजी करु नये. जबरदस्तीने खतांसोबत शेतकऱ्यांना अन्य वस्तू घेण्याचा आग्रह कंपनीने कृषी केंद्रामार्फत शेतकऱ्यांना करु नये. खतांचे दर कमी झाले असल्यास कमी झालेल्या दरानेच खतांची विक्री कृषी केंद्रांनी करावी. शेतकऱ्यांची विक्री दराबाबत फसवणूक करु नये. कृषी केंद्रांना देण्यात येणाऱ्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे अन्यथा पालन न करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी सांगितले.           आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची आढावा बैठक श्री. षन्मुगराजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाब

वीज पडून एकाचा मृत्यू अवकाळी पावसाने 341 हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान

Image
वीज पडून एकाचा मृत्यू  अवकाळी पावसाने 341 हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान वाशिम दि.27 (जिमाका) वाशिम तालुक्यातील कोंढाळा (झामरे) येथील ज्ञानेश्वर इंगोले (वय 28) या युवकाचा आज 27 एप्रिल रोजी अंगावर वीज पडून मृत्यू झाला.जिल्ह्यात 26 एप्रिल रोजी पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे 341.84 हेक्टरवरील शेत पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान मानोरा तालुक्यात झाले असून या तालुक्यात 270 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 12.9 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. मानोरा तालुक्यात वीज पडून एका गायीचा मृत्यू झाला. कारंजा आणि मानोरा तालुक्यात अनुक्रमे 12 आणि 10 अशी एकूण 22 घरांची पडझड झाली.       अवकाळी पाऊस व गारपिटीने रिसोड तालुक्यात 19 हेक्टरवरील कांदा पिकाचे, मालेगाव तालुक्यात 2 हेक्टरवरील आंबा आणि कांदा बी चे, मंगरूळपीर तालुक्यात 20 हेक्‍टरवरील भाजीपाला, लिंबू व कांदा बी,कारंजा तालुक्यात 30.80 हेक्टरवरील पपई, कांदा,ज्वारी, संत्रा, मूग, भाजीपाला,बरबटी, पेरू, गहू व तीळ पिकाचे आणि मानोरा तालुक्यात  270 हेक्टरमधील शेत पीक व फळ पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक म

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 एप्रिल रोजी वाशीम येथील आकाशवाणीच्या प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन

Image
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 एप्रिल रोजी वाशीम येथील आकाशवाणीच्या प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन  वाशिम दि 27 (जिमाका) वाशीम येथे नवीन नगर परिषद इमारतीच्या परिसरात असलेल्या अग्निशमन कार्यालयासमोर आकाशवाणीच्या एफ.एम. ट्रान्समीटर 100 वॅटच्या 100.1 मेगाहर्ट प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात येणार आहे.        वाशिम येथील कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून खासदार भावना गवळी व आमदार लखन मलिक यांची उपस्थिती राहणार आहे.वाशिमच्या प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतर रेडिओच्या श्रोत्यांना मुंबई आकाशवाणी केंद्राच्या विविध भारतीचे कार्यक्रम मानोरा,कारंजा व मंगरूळपीरसह संपूर्ण जिल्ह्यात ऐकायला मिळणार आहे.

कारलीच्या शेतकरी कुटे कुटुंबाला मिळाला सलोखा योजनेचा लाभ जिल्हाधिकाऱ्यांनी दिली नोंदणीकृत शेतीची कागदपत्रे

Image
कारलीच्या शेतकरी कुटे कुटुंबाला मिळाला सलोखा योजनेचा लाभ  जिल्हाधिकाऱ्यांनी दिली नोंदणीकृत शेतीची कागदपत्रे  वाशिम दि.26 (जिमाका) शेत जमिनीच्या ताब्यावरून आणि वहीवाटीवरून शेतकऱ्यांचा आपसी वाद मिटवून समाजात सलोखा निर्माण होऊन एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यात आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीन जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दुरुस्तीसाठी नाममात्र मुद्रांक शुल्क आणि नाममात्र नोंदणी फी आकारून सलोखा योजनेचा लाभ वाशिम तालुक्यातील कारली येथील शेतकरी कुटे कुटुंबाला मिळाला.जिल्हाधिकारी  षण्मुगराजन एस.यांच्या हस्ते आज त्यांच्या कक्षात दुय्यम निबंधक( मुद्रांक) यांच्याकडील गट अदलाबदलीचे नोंदणीकृत शेतीशी संबंधित असलेली कागदपत्रे शेतकरी कुटे कुटुंबातील खातेदारांना देण्यात आली.यावेळी वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,तहसीलदार गजेंद्र मालठाणे व कारलीचे तलाठी श्री.राठोड उपस्थित होते.        शेतकऱ्यांचे गट अदलाबदलीचे प्रकरणे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.सलोखा योजनेमुळे गट अदलाबदलीचा मार्ग आता सुकर झाला आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न   वाशिम,दि.२६ (जिमाका) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,वाशिम येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,वाशिम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.वाशिम व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांची जत्रा व सामाजिक न्याय पर्व अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय प्राचार्य किशोर वाहाणे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,वाशिमचे अध्यक्ष लक्ष्मण राऊत,गुणवंत,मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह,वाशिमचे गृहपाल शेषराव इंगोले,मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह वाशिमच्या गृहपाल श्रीमती वर्षा लाकडे, व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिमचे विधी अधिकारी किरण राऊत उपस्थित होते.       मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी दीप प्रज्वलन केले व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.              कार्यक्रमाच्या प

शासकीय योजनांच्या जत्रेसाठी यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे - षण्मुगराजन एस.

Image
शासकीय योजनांच्या जत्रेसाठी यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे                                               -  षण्मुगराजन एस.           वाशिम, दि. 26 (जिमाका) :   शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. 15 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीत “जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची ” हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन शासकीय यंत्रणांनी मिशन मोडवर करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी दिले.              आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात शासकीय योजनांच्या जत्रेच्या अनुषंगाने विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख यांची पुर्वतयारी सभा आयोजित करण्यात आली. यावेळी श्री. षण्मुगराजन बोलत होते. सभेत मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अमोल शिंदे हे दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होते.सभेत उपवनसंरक्षक श्री. वायकोस, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांची  प्रमुख  उपस्थित होती.              श्री. षण्मुगराजन म्हणाले, विविध 

तुळजापूरच्या मुलांच्या निवासी शाळेत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Image
तुळजापूरच्या मुलांच्या निवासी शाळेत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात  वाशिम दि.२५(जिमाका) मंगरूळपीर तालुक्यातील तुळजापूर येथील गुणवंत मागासवर्गीय मुलांच्या निवासी शाळेत सन 2023 - 24 या शैक्षणिक सत्राकरीता रिक्त सेमी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ६ ते १० वीच्या प्रवेशाकरिता २८ एप्रिल ते २६ जून २०२३ या कालावधीत प्रवेश अर्ज निवासी शाळेत उपलब्ध होणार आहे.               निवासी शाळेचा विद्यार्थ्यांना कोणतीही फी न घेता मोफत प्रवेश दिला जातो.निवासी शाळेत मुलांना निवास,सुसज्ज अद्यावत वर्ग खोल्या, ग्रंथालय, भोजन,पाठ्यपुस्तके व गणवेश अशाप्रकारच्या सुविधा मोफत आहे.        विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता निवासी शाळेमध्ये वेळोवेळी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेमध्ये सन २०२२-२३ मध्ये तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे. रिक्त जागी जातनिहाय असलेल्या आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येईल. त्यासाठी प्रवेश अर्ज वाटप सुरू आहे. निवासी शाळेत अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस २६ जून २०२३ आहे              मुलांकरिता सन २०२३-२४ यावर्षाकरिता रिक्त

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 30 एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी

Image
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक  30 एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी  वाशिम दि.२५ (जिमाका) कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजाच्या संचालक मंडळाच्या सन २०२३ -२८ या कालावधीच्या निवडणुकीकरिता मतदान ३० एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी त्याच दिवशी दुपारी ४ वाजतानंतर मतदान संपल्यानंतर मंगरुळपीर मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती,शेतकरी निवास येथे होणार आहे.            या निवडणुकीकरिता कारंजा येथील मूलजी जेठा नगर परिषद उर्दू हायस्कूल,मंगरूळ वेस,दारव्हा रोड, कारंजा येथे मतदान केंद्र आहे.या केंद्रात १९२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.सेवा सहकारी संस्थेचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य पुढील शहर व गावातील आहे. यामध्ये विविध कार्यकारी सोसायटी संस्था कारंजा,भडशिवनी,दादगाव,धामणी, गायवळ,गिर्डा,कामठवाडा, काकडशिवणी,काळी,पसरणी,पिंपरी (बारहाट),पिंपळगाव,सोहळ,शहा व शेलुवाडा येथील एकूण १९२ मतदार,                 जिल्हा परिषद शाळा पोहा येथील मतदान केंद्रात पोहा,बेलमंडळ, किनखेड,लोहगाव,लोहारा,महागाव, मुरंबी,पारवा,शेवती, वळवी व वाई येथील १४० मतदार मतदान करतील. जिल्हा परिषद हायस

सामाजिक न्याय पर्वानिमित्तज् येष्ठ नागरीक व दिव्यांग सामाजिक सुरक्षितता योजनेबाबत कार्यशाळा उत्साहात

Image
सामाजिक न्याय पर्वानिमित्त ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग सामाजिक सुरक्षितता योजनेबाबत कार्यशाळा उत्साहात        वाशिम,दि.२५ (जिमाका) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,वाशिम येथे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,वाशिम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. वाशिम,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,वाशिम आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांची जत्रा व सामाजिक न्याय पर्वाअंतर्गत ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग यांना सामाजिक सुरक्षितता योजना उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन आज सामाजिक न्याय भवनातील सभागृहात करण्यात आले.               अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही.ए.टेकवाणी होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एल.बी राऊत,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश सोनवणे,ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष पी.डी. जाधव,डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त शिवमंगलअप्पा राऊत, व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वनमाला पेंढारकर, मुख्य लोक अभिरक्षक प

जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन

Image
जिल्हा न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालयाचे उद्घाटन वाशिम,दि.२५ (जिमाका) जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाने नियुक्त केले तज्ञ विधिज्ञ राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार गरजुंना मोफत विधि सेवा देण्यासाठी विधी साह्य संरक्षण सल्लागार (एल. ए. डि. सि. एस) ही योजना सुरू करण्यात आली आहे.या अनुषंगाने जिल्हा व सत्र न्यायालय वाशिम येथे लोक अभिरक्षक कार्यालय स्थापीत करण्यात आले आहे.या कार्यालयाचे उद्घाटन २४ एप्रिल रोजी प्रमुख व जिल्हा व सत्र न्यायाधीश अमोघ कलौती यांच्या हस्ते करण्यात आले.           अभिरक्षक कार्यालयाच्या माध्यमातून कायदेविषयक योजना राबवली जाणार आहे. गरजू व गरिब लोकांना यांचा लाभ मिळणार आहे.        याकरीता लोक अभिरक्षक म्हणून निवड करण्यात आली असून  मुख्य लोक अभिरक्षक म्हणून ऍड.परमेश्वर शेळके,उपमुख्य लोक अभिरक्षक ऍड. वर्षा रामटेके आणि सहायक लोक भिरक्षक म्हणून ऍड. अतुल पंचवटकर,ऍड.हेमंत इंगोले, ऍड. शुभांगी खडसे,ऍड.राहूल पुरोहित या सहा विधीज्ञांची जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधि प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशानुस

सामाजिक न्याय पर्वानिमित्त दक्षता पथक प्रकरणांची त्रृटी पूर्तता

Image
सामाजिक न्याय पर्वानिमित्त दक्षता पथक प्रकरणांची त्रृटी पूर्तता  वाशिम,दि.२५ (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संकतल्पनेतुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय पर्वाचे आयोजन करण्यात येत आहे.याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिमद्वारे आज २५ एप्रिल रोजी दक्षता पथकाने चौकशी करुन अहवाल सादर केलेल्या प्रकरणी अर्जदारांकडून नियम २५ अन्वये नोटीसींच्या अनुषंगाने प्रकरणांचा जलदगतीने निपटारा व्हावा म्हणून त्रुटी पूर्तता शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरात निवडणुक संबंधित अर्जदारांनी सहभाग नोंदविला.सामाजिक न्याय पर्व काळात अशाच प्रकारचे विविध उपक्रम समिती कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणार आहे.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिमचे उपायुक्त तथा सदस्य उमेश सोनवणे यांनी केले आहे.

कृषी निविष्ठांच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण समिती

Image
कृषी निविष्ठांच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण समिती वाशिम दि २५( जिमाका ) कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून विक्री होणाऱ्या बियाणे,खते व कीटकनाशके इत्यादी निविष्ठांच्या दर्जाबाबत शेतकऱ्यांकडून, अन्य व्यक्ती, संस्था व प्रसिद्धी माध्यमातून तक्रारी प्राप्त होतात. अशा तक्रारीची त्वरित तक्रार घेण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. वाशिम उपविभागीय कृषी अधिकारी हे समितीचे अध्यक्ष आहेत.सर्व तालुका कृषी अधिकारी,कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र व महाबीजचे प्रतिनिधी हे सदस्य तर पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.कृषी निविष्ठांबाबतच्या तक्रारी या तक्रार निवारण समितीकडे कराव्यात. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपयुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपयुक्त          उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 लोकार्पण कार्यक्रम मुंबई दि 24 : शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अतिशय उपयुक्त ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीची ही 'फ्लॅगशीप' योजना सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय प्रभावीपणे राबविण्यात यावी,असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.        सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या एक दिवसीय परिषदेत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- 2.0 च्या लोकार्पणाचा कार्यक्रम झाला.यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर,अपर मुख्य सचिव दीपक कपूर,ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला,प्रधान सचिव एकनाथ डवले,अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे,विजय सिंगल,पी अन्बलगन, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी उपस्थित होते.        यावेळी मिशन- २०२५ या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्

समृद्धी महामार्गकारंजा इंटरचेंजवर आतापर्यंत १५८ वाहन चालकांचे समुपदेशन तर ४४ वाहन चालकांवर कारवाई

Image
समृद्धी महामार्ग कारंजा इंटरचेंजवर आतापर्यंत १५८ वाहन चालकांचे समुपदेशन तर ४४ वाहन चालकांवर कारवाई  वाशिम दि.२२ (जिमाका) डिसेंबर २०२२ मध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर - मुंबई दरम्यानचा नागपूर - शिर्डी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. या महामार्गावर छोट्या वाहनांची वेगमर्यादा ताशी १२० कि.मी तर जड वाहनांसाठी ताशी ८० कि.मी.निश्चित केली आहे. ही मर्यादा निश्चित केली असली तरी काही वाहन चालक त्याचे उल्लंघन करीत आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.समृद्धीवरील अपघाताला आळा घालण्यासाठी आरटीओ विभाग काम करीत आहे.या महामार्गावरील कारंजा येथील इंटरचेंजवर आतापर्यंत १५८ वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आले असून ४४ वाहन चालकांवर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय,वाशिमच्या वतीने कारवाई करण्यात आली.           जिल्ह्यातून जवळपास ९६ किलोमीटरचा समृद्धी महामार्ग जातो. कारंजा,शेलुबाजार आणि मालेगाव तालुक्यातील वारंगी येथे या महामार्गावर इंटरचेंज आहे.वाशिम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिर

साखरा येथे बिज प्रक्रिया मोहीमेला सुरुवात

Image
साखरा येथे बिज प्रक्रिया मोहीमेला सुरुवात वाशिम दि.२२(जिमाका) वाशिम तालुक्यातील साखरा येथे बेस्ट ऍग्रो लाईफ या कंपनीने बीज प्रक्रियेबाबत आज २२ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर उपस्थित होते.त्यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे फायदे,कीड नियंत्रण व उत्पन्न वाढीविषयी मार्गदर्शन केले.  व तसेच बीज प्रक्रियेसाठी कोणती उत्पादने वापरावे याविषयी देखील सांगितले.          वार्डनमध्ये बुरशीनाशक व कीटकनाशक दोन्ही  एकत्र असल्यामुळे शेतकऱ्यांना ते उत्पादन सोयीचे व स्वस्त पडेल अशी माहिती तोटावर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.          यावेळी साखराचे सरपंच,ज्येष्ठ नागरिक व गावातील युवा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.           बेस्ट ऍग्रो लाइफ या कंपनीचे प्रतिनिधी हर्षल टाले, सुनील धाडवे व विकास चौधरी यांनी सोयाबीन बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांसमोर करून दाखविली.

नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत कार्यशाळा उत्साहात

Image
नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत कार्यशाळा उत्साहात  वाशिम,दि.२१(जिमाका) सामाजिक न्याय समता पर्वानिमीत्त अंतर्गत नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत कार्यशाळचे आयोजन आज २१ एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात करण्यात आले.              कार्यक्रमाला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिमचे अध्यक्ष लक्ष्मण राऊत, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष पी. एस. खंदारे,नायब तहसीलदार समाधान राठोड,तृतीपंथी श्रावणी मधुकर हिंगासपुरे, आरती लक्ष्मण चौधरी, स्त्री अब्रुरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक भालेराव, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.   कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन केले व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.        कार्यशाळेत हरिष वानखडे यांनी दि. 1 नोव्हेंबर, 2005 रोजी व त्यानंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचारींसाठी लागू असलेली नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना / राष्ट्र

सामाजिक न्याय पर्वानिमीत्य अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याबाबत जनजागृती

Image
सामाजिक न्याय पर्वानिमीत्य  अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याबाबत जनजागृती  वाशिम,दि.२१(जिमाका) जिल्ह्यात सामाजिक न्याय पर्व राबविण्यात येत आहे.या निमित्ताने आज २१ एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले            अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती वाशिमचे अध्यक्ष डॉ.रामकृष्ण कालापाड, प्रमुख पाहुणे मानसोपचार तज्ञ डॉ. मंगेश राठोड,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती वाशिमचे कार्याध्यक्ष पी. एस. खंदारे,स्त्री अबृरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक भालेराव, सहायक आयुक्त मारोती वाठ उपस्थित होते.          प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले.महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.         प्रास्ताविकात श्री.वानखडे यांनी अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याबाबत थोडक्यात माहिती देवून कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.       श्री. भालेराव यांनी अंधश्रद्धेमुळे समाजातील गरीब लोकांचे शोषण केले जात आहे.त्यांना आळा घालण्यासाठी या कायद्याचा खुप उपयोग होत असल्याचे सां

सामाजिक न्याय पर्वतृतीयपंथी जनजागृती शिबीर व ओळखपत्रांचे वाटप

Image
सामाजिक न्याय पर्व तृतीयपंथी जनजागृती शिबीर व ओळखपत्रांचे वाटप   वाशिम,दि.२१ (जिमाका) शासकीय योजनांची जत्रा व सामाजिक न्याय समता पर्वानिमित्ताने तृतीयपंथीयांच्या जनजागृती व ओळखपत्र वाटपाचे आयोजन आज २१ एप्रिल रोजी करण्यात आले.       कार्यक्रमाला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिमचे अध्यक्ष लक्ष्मण राऊत, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष पी.एस.खंदारे,नायब तहसीलदार समाधान राठोड, तृतीयापंथी श्रावणी हिंगासपुरे, आरती चौधरी,स्त्री अब्रुरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक भालेराव, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.           कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.              प्रास्ताविकात हरिष वानखडे यांनी तृतीयपंथी व्यक्तींबाबत समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देवून कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.            तृतीयपंथी श्रावणी हिंगासपुरे यांनी शासनाद्वारे मिळत असलेल्या ओळखपत्रामुळे एक समाज