ज्येष्ठ नागरीकांची केली आरोग्य तपासणी
- Get link
- X
- Other Apps
ज्येष्ठ नागरीकांची केली आरोग्य तपासणी
वाशिम, दि. 12 (जिमाका) : शासकीय योजनांची जत्रा व सामाजिक न्याय पर्वाअंतर्गत ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन माँ गंगा मेमोरीअल बाहेती हॉस्पीटल, वाशिम येथे आज 12 एप्रिल रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा जात पडताळणी समिती, वाशिम आणि माँ गंगा मेमोरीअल हॉस्पीटल, वाशिम यांच्या संयुक्त वतीने करण्यात आले.
या शिबीराला माँ गंगा मेमोरीअल बाहेती हॉस्पीटलच्या श्रीमती डॉ. बाहेती, परिचारीका व कर्मचारी, रामेश्वर टेकाळे, जनसेवा फाऊंडेशनचे जिल्हा पातळीवरील क्षेत्रीय प्रतिनिधी, लाभार्थी जेष्ठ नागरीक, अधिक्षीका कल्पना ईश्वरकर, समाज कल्याण निरीक्षक श्रीमती एस. एस. पाटील, आर. ए. शिरभाते, श्री. आर. टी. चव्हाण, श्रीमती संध्या देखणे यांची उपस्थिती होती.
शिबीराचे उद्घाटन श्रीमती अनुसयाबाई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीरामध्ये एकूण 25 ज्येष्ठ नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये जेष्ठ नागरीकांचे मधुमेह, उच्च रक्तदाब, यासारख्या विविध तपासण्या करण्यात आल्या. आरोग्य कसे निरोगी ठेवता येईल याबाबत उपस्थितांना आरोग्यविषयक माहिती देवून श्रीमती डॉ. बाहेती यांनी मार्गदर्शन केले.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment