17 एप्रिल रोजी ऊसतोड कामगारांसाठी शिबीर




17 एप्रिल रोजी ऊसतोड कामगारांसाठी शिबीर

        वाशिम, दि. 13 (जिमाका) : सामाजिक न्याय पर्व व शासकीय योजनांच्या जत्रेच्या अनुषंगाने जिल्ह्यात 17 एप्रिल रोजी जिल्हयातील आश्रमशाळेत ऊसतोड कामगारांसाठी नाव नोंदणीओळखपत्र वाटप करणेऊसतोड कामगारांसाठी पुनरागमन शिबीराचे (धान्य महोत्सवआयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर आश्रमशाळा श्रीगजाधरजी राठोड प्राथमिक आश्रमशाळाखापरदरीतामानोरावसंतराव नाईक माध्यमिक आश्रमशाळाफुलउमरीतामानोरातपस्वी काशिनाथ बाबा माध्यमिक आश्रमशाळावाईगौळतामानोरासुधाकरराव नाईक प्राथमिक आश्रमशाळाइंगळवाडीतामानोराप्रियंका विजाभज प्राथमिक आश्रमशाळासोंडाताजिवाशिम येथे आयोजित करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व ऊसतोड कामगारांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.  असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप