तुळजापूरच्या मुलांच्या निवासी शाळेत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
- Get link
- X
- Other Apps
तुळजापूरच्या मुलांच्या निवासी शाळेत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
वाशिम दि.२५(जिमाका) मंगरूळपीर तालुक्यातील तुळजापूर येथील गुणवंत मागासवर्गीय मुलांच्या निवासी शाळेत सन 2023 - 24 या शैक्षणिक सत्राकरीता रिक्त सेमी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ६ ते १० वीच्या प्रवेशाकरिता २८ एप्रिल ते २६ जून २०२३ या कालावधीत प्रवेश अर्ज निवासी शाळेत उपलब्ध होणार आहे.
निवासी शाळेचा विद्यार्थ्यांना कोणतीही फी न घेता मोफत प्रवेश दिला जातो.निवासी शाळेत मुलांना निवास,सुसज्ज अद्यावत वर्ग खोल्या, ग्रंथालय, भोजन,पाठ्यपुस्तके व गणवेश अशाप्रकारच्या सुविधा मोफत आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता निवासी शाळेमध्ये वेळोवेळी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्तेमध्ये सन २०२२-२३ मध्ये तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे. रिक्त जागी जातनिहाय असलेल्या आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येईल. त्यासाठी प्रवेश अर्ज वाटप सुरू आहे. निवासी शाळेत अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस २६ जून २०२३ आहे
मुलांकरिता सन २०२३-२४ यावर्षाकरिता रिक्त असलेल्या प्रवर्गनिहाय जागा अनुसूचित जातीसाठी ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के,विमुक्त जाती भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रवर्ग २ टक्के आणि दिव्यांग व अनाथ मुलांकरिता ३ टक्के असे प्रवेशासाठी आरक्षण निश्चित केले आहे.संपर्कासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुमेध चक्रनारायण यांच्याशी (९९२३९७२१५६) संपर्क साधावा.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment