साखरा येथे बिज प्रक्रिया मोहीमेला सुरुवात
साखरा येथे बिज प्रक्रिया मोहीमेला सुरुवात
वाशिम दि.२२(जिमाका) वाशिम तालुक्यातील साखरा येथे बेस्ट ऍग्रो लाईफ या कंपनीने बीज प्रक्रियेबाबत आज २२ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर उपस्थित होते.त्यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे फायदे,कीड नियंत्रण व उत्पन्न वाढीविषयी मार्गदर्शन केले.
व तसेच बीज प्रक्रियेसाठी कोणती उत्पादने वापरावे याविषयी देखील सांगितले.
वार्डनमध्ये बुरशीनाशक व कीटकनाशक दोन्ही एकत्र असल्यामुळे शेतकऱ्यांना ते उत्पादन सोयीचे व स्वस्त पडेल अशी माहिती तोटावर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
यावेळी साखराचे सरपंच,ज्येष्ठ नागरिक व गावातील युवा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेस्ट ऍग्रो लाइफ या कंपनीचे प्रतिनिधी हर्षल टाले, सुनील धाडवे व विकास चौधरी यांनी सोयाबीन बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांसमोर करून दाखविली.
Comments
Post a Comment