रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ३० एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी
रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
३० एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी
वाशिम दि.२८ (जिमाका) कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोडच्या संचालक मंडळाच्या सन २०२३ -२८ या कालावधीच्या निवडणुकीकरिता मतदान ३० एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजतापासून सुरू होईल.ही मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय,प्रशासकीय इमारत,तळ मजला,गाळा क्र.१०४ रिसोड येथे होणार आहे.
या निवडणुकीकरिता 1- रिसोड मतदान केंद्रावर सेवा सहकारी संस्था मतदारसंघासाठी तहसिल कार्यालय,रिसोड येथे मतदान केंद्र राहणार असून या मतदान केंद्रावर रिसोड,कंकरवाडी,चिचंबाभर,लिंगा, कोतवाल,खडकी,सदार,देगाव, वाडीरायताळ,मोहोजा (इंगोले),सेलु (खडसे),गणेशपूर,करडा, भोकरखेडा,हराळ,किनखेडा, मोठेगाव,एकलासपूर धोडप (बु) व भापुर येथील सेवा सहकारी संस्थेचे
मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.
2-रिसोड या केंद्रावर ग्रामपंचायत मतदारसंघासाठी तहसिल कार्यालय रिसोड येथे कंकरवाडी, चिंचाबाभर,लिंगा,कोतवाल,खडकी सदार,देगाव,वाडीरायताळ,मोहोजा (इंगोले),सेलु (खडसे), गणेशपुर (रि), करडा,घोन्सर,निजामपूर, मांगवाडी, आगरवाडी,पळसखेड,बिबखेड, सवड,मांगवाडी,हराळ, किनखेडा, मोठेगाव,एकलासपूर धोडप (बु) भापूर येथील मतदार मतदान करतील.
3 - रिसोड व्यापारी व अडते मतदारसंघासाठी तहसिल कार्यालय रिसोड येथे व्यापारी व अडते मतदार मतदान करतील. 4- हमाल व मापारी मतदारसंघासाठी तहसिल कार्यालय रिसोड येथील मतदान केंद्रावर हमाल व मापारी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.
5- मोप सेवा सहकारी संस्था मतदारसंघासाठी जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा मोप येथे भरजॅहागीर, कुऱ्हा,चाकोली,जवळा,बोरखेडी, मोरगव्हाण,मोजाबंदी,मांडवा,लोणी (खु),लोणी (बु), मोप, कन्हेरी,आसोला,वाकद, महागाव,पिंपरखेडवाडी,बाळखेड, गोहगाव येथील मतदार मतदान करतील.
6 - मोप या मतदान केंद्रासाठी ग्रामपंचायत मतदारसंघासाठी जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा,मोप येथे भरजॅहागीर, कुऱ्हा,चाकोली, जवळा,बोरखेडी,मोरगव्हाण, मोजाबंदी,मांडवा, लोणी( बु),लोणी (खु),मोप,वाकद, महागाव, पिंपरखेडवाडी,बाळखेड व गोहगाव येथील मतदार मतदान करतील. 7- गोवर्धन केंद्रसाठी सेवा सहकारी संस्था मतदारसंघाकरीता जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा या मतदान केंद्रावर गोवर्धन,गोभणी,धोडप (खु), येवता, पेनबोरी, दापुरी,वाघी(खु), वडजी, शेलगाव (राजगुरे),मसलापेन, मांगुळ(झनक), केनवड,नंधना,जांब (आढाव),कळमगव्हाण,कुकसा, नेतन्सा,अंचळ,जोगेश्वरी,नावली,
गौढाळा,नागझी,उकीरखेड व लेहणी येथील मतदार मतदान करतील.
8- गोवर्धन या मतदान केंद्रावर ग्रामपंचायत मतदारसंघ जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा,गोवर्धन येथे गोवर्धन, गोभणी,धोडप (खु),येवता,पेनबोरी, दापुरी,वाघी (खु),वडजी,शेलगव (राजगुरे),मसलापेन,मांगुळ(झनक), नावाली,केशवनगर,केनवड,नंधाना, जांब(आढाव),कळमगव्हाण,कुकसा, नेतन्सा,अंचळ,जोगेश्वरी,प्रिंप्री(सरहद)कोयाळी (बु), गौढाळा,नागझरी, करंजी व लेहणी येथील मतदार मतदान करतील.
9- आसेगाव पेन या मतदान केंद्रासाठी सेवा सहकारी संस्था मतदारसंघाचे मतदार जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा,आसेगावपेन येथे आसेगाव पेन,बेलखेडा,येवती,रिठद, पार्डी(तिखे),हिवरापेन,देऊळगावबंडा, कोयाळी(खु),कोयाळी(बु),वरुडतोफा,चिखली,घोटा,व्याड,कवठा,वनोजा येथील मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.
10 - आसेगावपेन ग्रामपंचायत मतदारसंघ जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा,आसेगावपेन येथे आसेगावपेन, बेलखेडा,येवती,रिठद,पार्डी(तिखे), हिवरापेन,देऊळगावबंडा,कोयाळी (खु),कायाळी (बु),चिखली,घोटा, व्याड,कवठा,वनोजा व चिंचाबापेन येथील मतदार मतदान करतील.असे निवडणुक निर्णय अधिकारी, कृषि उत्पन्न बाजार समिती,रिसोड यांनी कळविले आहे.
******
Comments
Post a Comment