उकळीपेन येथे दिली समाज कल्याण योजनांची माहिती




उकळीपेन येथे दिली समाज कल्याण योजनांची माहिती

           वाशिम, दि. 18 (जिमाका) : सामाजिक न्याय पर्वाच्या निमित्ताने वाशिम तालुक्यातील उकळीपेन येथे १७ एप्रिल रोजी समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे नारायण बर्डे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली. यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग बीज भांडवल योजना, दिव्यांग-अव्यंग विवाह योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना,आंतरजातीय विवाह योजना, जिल्हा परिषद सेस फंड योजना, वृध्दांकरीता वृध्दाश्रम योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजना यासह अन्य योजनांची माहिती दिली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या समाज कल्याणच्या योजनांवर आधारीत समर्पण या घडीपुस्तिकेचे, योजनांच्या एल.डी.फोमशीट बॅनरचे व समता दिनदर्शिकेचे वितरण उपस्थितांना करण्यात आले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश