महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम




महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त

विविध कार्यक्रम

       वाशिम, दि. 06 (जिमाका) : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिवस महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत राज्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती विविध कार्यक्रमाच्या आयोजनातून साजरी करण्यात येणार आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या समन्वयाने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व व एकांकिका स्पर्धा विविध शाळांमध्ये 10 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. 11 एप्रिल 2023 रोजी रॅलीचे आयोजन येणार आहे. तसेच इतर कार्यक्रम सामाजिक न्याय भवन येथे आयोजीत करण्यात आले आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त गीत गायन कार्यक्रमाचे सुध्दा आयोजन करण्यात आले आहे.

                                                                                                                                      *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश