17 एप्रिल रोजी नियोजन भवन येथे गो-आधारीत शेती प्रशिक्षण




17 एप्रिल रोजी नियोजन भवन येथे

गो-आधारीत शेती प्रशिक्षण

      वाशिम, दि. 13 (जिमाका) : कृषी विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) वाशिम यांच्या संयुक्त वतीने गो- आधारीत शेती या विषयावर शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन १७ एप्रिल सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे करण्यात आले आहे. प्रमुख वक्ते म्हणून अहमदाबाद येथील गोकृपा अमृत निर्माते बंसी गीर गोशाळेचे गोपालभाई सुतारीया हे  मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमात प्राकृतिक शेती, गो आधारीत विविध औषधी व त्याचे विविध आजारावर उपचार, नैसर्गिक आहार, आरोग्यदायी परिवार या संकल्पनेवर आधारीत यावेळी सादरीकरण होणार आहे. कार्यक्रम स्थळी गो कृपा अमृत एक लिटर बॉटलचे मोफत वितरण केले जाणार आहे. गो कृपा अमृत शेतीमध्ये उपयोग केलेल्या शेतकऱ्यांचे अनुभव कथन यावेळी होणार आहे. या गो-आधारीत शेती प्रशिक्षण कार्यक्रमाला नैसर्गिक शेती, विषमुक्त शेती, सेंद्रिय शेती करणारे व प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा)  वाशिम यांनी केले आहे.

                                                                                                                                           *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश