आठ गावात सुरू होणार ग्रामीण कौशल्य विकास केंद्र
- Get link
- X
- Other Apps
आठ गावात सुरू होणार
ग्रामीण कौशल्य विकास केंद्र
वाशिम दि.२८(जिमाका) ग्रामीण भागातील युवक - युवतींना रोजगारक्षम बनवून बेरोजगाराच्या जटील समस्येचा सामना करण्यासाठी त्यांना कौशल्य,उद्योजकता व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतीमध्ये प्रायोगिक तत्वावर ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे.यामध्ये वाशिम तालुक्यातील अनसिंग आणि काटा, मंगरूळपीर तालुका - शेलू (खुर्द) आणि सोनखास,मानोरा तालुका - पोहरादेवी आणि शेंदुर्जना (आढाव) आणि रिसोड तालुका - रिठद आणि वाकद येथे ही केंद्र सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी दिली.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment