प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 एप्रिल रोजी वाशीम येथील आकाशवाणीच्या प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 एप्रिल रोजी वाशीम येथील आकाशवाणीच्या प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन 

वाशिम दि 27 (जिमाका) वाशीम येथे नवीन नगर परिषद इमारतीच्या परिसरात असलेल्या अग्निशमन कार्यालयासमोर आकाशवाणीच्या एफ.एम. ट्रान्समीटर 100 वॅटच्या 100.1 मेगाहर्ट प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात येणार आहे.
       वाशिम येथील कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून खासदार भावना गवळी व आमदार लखन मलिक यांची उपस्थिती राहणार आहे.वाशिमच्या प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतर रेडिओच्या श्रोत्यांना मुंबई आकाशवाणी केंद्राच्या विविध भारतीचे कार्यक्रम मानोरा,कारंजा व मंगरूळपीरसह संपूर्ण जिल्ह्यात ऐकायला मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश