समान संधी केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्ती व शिष्यवृत्तीच्या माहितीसाठी विशेष अभियान
- Get link
- X
- Other Apps
समान संधी केंद्राच्या माध्यमातून
व्यसनमुक्ती व शिष्यवृत्तीच्या माहितीसाठी विशेष अभियान
वाशिम, दि. 13 (जिमाका) : सामाजिक न्याय पर्व व शासकीय योजनांची जत्रेच्या अनुषंगाने जिल्ह्यात 20 एप्रिल रोजी समान संधी केंद्राच्या माध्यमातून नशामुक्त भारत अभियानांतर्गत व्यसनमुक्तीच्या संदर्भाने जनजागृती, चित्रप्रदर्शन, चर्चासत्र, तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन, सभा, मेळावे, चित्रकला, वक्तृत्व व निबंध स्पर्धा आदी कार्यक्रमाद्वारे प्रचार, प्रसार व शिष्यवृत्ती योजनांच्या माहिती देण्यासाठी विशेष अभियान महाविद्यालयातून राबविण्यात येणार आहे. हे अभियान श्री. तुळशीरामजी जाधव कला महाविद्यालय, लाखाळा, वाशिम, श्री. रामरावजी झनक महाविद्यालय, मालेगाव, श्रीमती सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा, श्री स्वामी समर्थ विद्यालय, मंगरुळपीर, भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रिसोड व विद्याभारती महाविद्यालय, कारंजा येथे राबविण्यात येणार आहे. तरी सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment