13 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री फडणवीस जिल्हयात
13 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री फडणवीस जिल्हयात
वाशिम, दि. 12 (जिमाका) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 13 एप्रिल रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी 11.45 वाजता हेलीकॉप्टरने अकोला येथून रिसोडकडे प्रयाण करतील. दुपारी 12.10 वाजता रिसोड- हिंगोली महामार्गावरील रिसोड हेलीपॅड येथे आगमन. दुपारी 12.15 वाजता मोटारीने महानंदा पेट्रोल पंपाजवळ आयोजित सभा स्थळाकडे प्रयाण. दुपारी 12.25 वाजता सभास्थळी आगमन. दुपारी 12.30 वाजता भारतीय जनता पार्टीच्या संकल्प सभेला उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता सभास्थळावरुन मोटारीने हेलीपॅडकडे प्रयाण करतील. दुपारी 2.05 वाजता हेलीपॅड येथे आगमन व दुपारी 2.10 वाजता हेलीकॉप्टरने प्रयाण करतील.
Comments
Post a Comment