गुणवंत विद्यार्थी वसतीगृहातसंध्या रजनी उत्साहात
- Get link
- X
- Other Apps
गुणवंत विद्यार्थी वसतीगृहात
संध्या रजनी उत्साहात
वाशिम, दि. 13 (जिमाका) : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा 11 एप्रिल हा जन्मदिवस महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत राज्यात उत्साहात साजरा करण्यात आला. त्याअनुषंगाने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत 11 एप्रिल रोजी संध्याकाळी गुणवंत मागासवर्गीय मुलाचे शासकीय वसतिगृह, नालंदा नगर, वाशिम येथे संध्या रजनी कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
उद्घाटन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी कवी, गायक व संगीतकार प्रज्ञानंद भगत व त्यांच्या सहकलावंतांनी संध्या रजनी कार्यक्रमात महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, गाडगे महाराज, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत गीत सादर करुन तसेच व्यसनमुक्ती, मुलींचे शिक्षण व समाज प्रबोधनपर गीत सादर करुन उपस्थितांकडून टाळयांची दाद घेतली. या कार्यक्रमाला मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहाच्या गृहपाल श्रीमती लाकडे व गुणवंत मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहाचे गृहपाल श्री. इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थीनी तसेच गुणवंत मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार हरिष वानखेडे यांनी मानले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment