नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत कार्यशाळा उत्साहात
नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत कार्यशाळा उत्साहात
वाशिम,दि.२१(जिमाका) सामाजिक न्याय समता पर्वानिमीत्त अंतर्गत नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत कार्यशाळचे आयोजन आज २१ एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिमचे अध्यक्ष लक्ष्मण राऊत, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष पी. एस. खंदारे,नायब तहसीलदार समाधान राठोड,तृतीपंथी श्रावणी मधुकर हिंगासपुरे, आरती लक्ष्मण चौधरी, स्त्री अब्रुरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक भालेराव, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन केले व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
कार्यशाळेत हरिष वानखडे यांनी दि. 1 नोव्हेंबर, 2005 रोजी व त्यानंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचारींसाठी लागू असलेली नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबतची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.तसेच या योजनेअंतर्गत शासन हिस्सा 14 टक्के व कर्मचारी हिस्सा 10 आपल्या एनपीएस खात्यामध्ये दर महिन्याला जमा होतो आहे तरी ही रक्कम आपल्या एनपीएस खात्यामध्ये जमा होत असल्याची खातरजमा प्रत्येक कर्मचारी यांनी केली पाहिजे असे सांगितले. व काही समस्या अथवा अडचणी असल्यास कार्यालयास संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संचालन प्रदिप गवळी व उपस्थितांचे आभार हरीष वानखेडे यांनी मानले.कार्यक्रमास जिल्ह्यातील तृतीयपंथी,नागरीक तसेच सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी,शासकीय वसतीगृहातील गृहपाल,शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक व समाज कार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग,सर्व ब्रिक्स प्रा. लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment