कारलीच्या शेतकरी कुटे कुटुंबाला मिळाला सलोखा योजनेचा लाभ जिल्हाधिकाऱ्यांनी दिली नोंदणीकृत शेतीची कागदपत्रे
कारलीच्या शेतकरी कुटे कुटुंबाला मिळाला सलोखा योजनेचा लाभ
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली नोंदणीकृत शेतीची कागदपत्रे
वाशिम दि.26 (जिमाका) शेत जमिनीच्या ताब्यावरून आणि वहीवाटीवरून शेतकऱ्यांचा आपसी वाद मिटवून समाजात सलोखा निर्माण होऊन एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यात आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीन जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दुरुस्तीसाठी नाममात्र मुद्रांक शुल्क आणि नाममात्र नोंदणी फी आकारून सलोखा योजनेचा लाभ वाशिम तालुक्यातील कारली येथील शेतकरी कुटे कुटुंबाला मिळाला.जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांच्या हस्ते आज त्यांच्या कक्षात दुय्यम निबंधक( मुद्रांक) यांच्याकडील गट अदलाबदलीचे नोंदणीकृत शेतीशी संबंधित असलेली कागदपत्रे शेतकरी कुटे कुटुंबातील खातेदारांना देण्यात आली.यावेळी वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,तहसीलदार गजेंद्र मालठाणे व कारलीचे तलाठी श्री.राठोड उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे गट अदलाबदलीचे प्रकरणे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.सलोखा योजनेमुळे गट अदलाबदलीचा मार्ग आता सुकर झाला आहे.एका आठवड्याच्या आत या योजनेचा लाभ घेता येणे शक्य झाले आहे.शेत जमीनधारकांचे अदलाबदल दुरुस्तीसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र 1 हजार रुपये आणि नोंदणी फी नाममात्र 1 हजार रुपये या योजनेअंतर्गत आकारण्यात येते.
शेतकऱ्यांचे गट अदलाबदलीची प्रकरणे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.सलोखा योजनेमुळे गट अदलाबदलीचा मार्ग सुकर झाला आहे.खातेदारांना गट अदलाबदलीचा आर्थिक व मानसिक त्रास कमी होऊन एका आठवड्याच्या आत या योजनेचा लाभ घेता येतो.ताब्यासोबतच त्या गटाची मालकीसुद्धा मिळते.कमी पैशात या योजनेतून गटाची अदलाबदलीचे काम होण्यास मदत होत आहे.
तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गट अदलाबदलीची प्रकरणे शोधली तर जास्तीत जास्त एका आठवड्यात अशाप्रकारची प्रकरणे सोडवली जाऊ शकतात.अशा प्रकारणामध्ये संबंधित खातेदाराला गट आदलाबदली नोंदणी घेण्यासाठी तयार करावे लागते.त्यांना या योजनेचे महत्त्व पटवून दिले तर खातेदार तयार होतात.कारण प्रकरणे अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने खातेदार देखील तयार होतात. संबंधित खातेदारांमध्ये समन्वय घडवून आणल्यास या योजनेतून गट अदलाबदलीच्या प्रकरणांचा न्याय देता येतो.
कारली येथील खातेदाराचा ताबा एका गटात पण खातेदाराचे नाव दुसऱ्या गटात गेले होते.त्यामुळे खातेदाराचा मूळ गट बदलला होता. या योजनेमुळे खातेदारांचे नाव मूळ गटात करून देण्यात आले.त्यामुळे खातेदारांचे नाव सातबारामध्ये मूळ गटात येण्यास मदत झाली.या योजनेमुळे शेतकऱ्याचे नाव मूळ गटात आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.शेत जमिनीची कागदपत्रे बरोबर आहे. केवळ गटाची अदलाबदल झाल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.या योजनेमुळे शेतकऱ्याला मूळ गटाचा ताबा मिळण्यास व मूळ मालकी मिळण्यास मदत झाली आहे.
दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत शेतीची कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते चंद्रप्रकाश कुटे,सुनंदा कुटे, गोपाल कुटे व नारायण कुटे यांना देण्यात आली.या शेतकऱ्यांच्या शेतीचे 1980 ला एकत्रीकरण झाले होते, तेव्हा गटात अदलाबदल झाली. जमिनीच्या चतु:सीमा ह्या वेगवेगळ्या येत होत्या.ह्या चुका सलोखा योजनेतून दुरुस्त करण्यात आल्या. गटात अदलाबदली करण्यासाठी त्यांना 50 हजार रुपये शासकीय खर्च येणार होता.त्यासाठी काही कालावधी लागणार होता,मात्र या योजनेअंतर्गत नाममात्र 2 हजार रुपये भरून मूळ गट मालकांना त्यांच्या गटाचा ताबा मिळण्यास मदत झाली.
Comments
Post a Comment