सामाजिक न्याय पर्वतृतीयपंथी जनजागृती शिबीर व ओळखपत्रांचे वाटप


सामाजिक न्याय पर्व

तृतीयपंथी जनजागृती शिबीर व ओळखपत्रांचे वाटप 

 वाशिम,दि.२१ (जिमाका) शासकीय योजनांची जत्रा व सामाजिक न्याय समता पर्वानिमित्ताने तृतीयपंथीयांच्या जनजागृती व ओळखपत्र वाटपाचे आयोजन आज २१ एप्रिल रोजी करण्यात आले.
      कार्यक्रमाला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिमचे अध्यक्ष लक्ष्मण राऊत, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष पी.एस.खंदारे,नायब तहसीलदार समाधान राठोड, तृतीयापंथी श्रावणी हिंगासपुरे, आरती चौधरी,स्त्री अब्रुरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक भालेराव, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
          कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.    
         प्रास्ताविकात हरिष वानखडे यांनी तृतीयपंथी व्यक्तींबाबत समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देवून कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.
           तृतीयपंथी श्रावणी हिंगासपुरे यांनी शासनाद्वारे मिळत असलेल्या ओळखपत्रामुळे एक समाजामध्ये ओळख मिळत असल्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ याद्वारे घेत असल्याचे सांगून त्यांनी वाशिम जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून आपली नोंदणी करुन ओळखपत्र मिळविण्याचे आवाहन केले. 
         दरम्यान राजपाल राठोड, सुनिल राठोड,तोशीबा शेख यांना मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.
            श्री.भालेराव म्हणाले, तृतीयपंथी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावरील प्रयत्नाबरोबर लोकचळवळ सुद्धा उभारणे आवश्यक असल्याचे सांगून तृतीयपंथीयांची नोंदणी ही तालुका पातळीवर झाल्यास प्रत्येक तृतीयपंथी यांची नोंदणी करणे शक्य होईल असे सांगितले .
                श्री.पी.एस.खंदारे यांनी तृतीयपंथी यांच्या कलागुणांचा आदर करुन त्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे असे सांगितले.
             श्री.वाठ यांनी तृतीयपंथी व्यक्तींच्या नोंदणीची व्याप्ती वाढवण्यासाठी तालुकास्तरावर नोंदणी शिबीरासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.  
            संचालन प्रदिप गवळी यांनी केले.उपस्थितांचे आभार हरीष वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील तृतीयपंथी,नागरीक तसेच सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी,शासकीय वसतीगृहातील गृहपाल,शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग,सर्व ब्रिक्स प्रा.लि.व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित