पांडव (उमरा) येथील नागरिकांना दिली समाज कल्याणच्या योजनांची माहिती
पांडव (उमरा) येथील नागरिकांना दिली समाज कल्याणच्या योजनांची माहिती
वाशिम,दि.१५ (जिमाका) १ एप्रिल ते १ मे दरम्यान सामाजिक न्याय पर्व साजरे करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालय पांडव (उमरा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित लाभार्थ्यांसह ग्रामस्थांना देण्यात आली.यावेळी अनुसूचित जातीच्या वस्तीमध्ये स्वच्छता अभियानसुध्दा राबविण्यात आले.
अध्यक्षस्थानी सरपंच प्रमोद चौधरी होते. प्रमुख पाहूणे संजय मापारी,वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बापूराव उगले, माजी सभापती सुभाषराव चौधरी उपस्थित होते. सामाजिक न्याय विभागाचे निरीक्षक देवानंद लकडे,श्री.वानखेडे, अधिक्षिका कल्पना ईश्वरकर श्री. उगले,श्री.लहाडके,श्री.इंगोले उपस्थित होते.
कार्यक्रमाला लक्ष्मण कुंभार, गौतम धुळधुळे,तुळशीराम पानभरे, रामचंद्र कालापाड,विजु ढोबळे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या समता दिनदर्शिका,समर्पण घडीपुस्तिका व एल डी.फोमशीट बॅनरचे वितरण ग्रामपंचायतीच्या कार्यालयात व उपस्थित ग्रामस्थांना यावेळी करण्यात आले.संचालन व उपस्थितांचे आभार ग्रामसेवक प्रशांत बोरचाटे यांनी मानले.
Comments
Post a Comment