जिल्हयात 10 दिवसध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सुट
- Get link
- X
- Other Apps
जिल्हयात 10 दिवस
ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सुट
वाशिम, दि. 13 (जिमाका) : जिल्हयात कायदा सुव्यवस्था लक्षात घेता जिल्हयासाठी सन 2023 या वर्षामध्ये एकूण 10 दिवसाकरीता ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट देण्यात आली आहे. यामध्ये 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त, 19 सप्टेंबर रोजी गणेश स्थापना, 28 व 29 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच दोन दिवसाचा कालावधी, 28 सप्टेंबर रोजी ईद-ए मिलाद, 22 व 23 ऑक्टोबर रोजी नवरात्री उत्सव, 12 नोव्हेंबर रोजी दिवाळीतील लक्ष्मी पुजनाचा दिवस, 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस आणि 31 डिसेंबर वर्षाच्या शेवटचा दिवस अशा एकूण 10 दिवसाकरीता ध्वनीची विहीत मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत वापरास सुट देण्यात येत आहे. अधिसूचनेतील केलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदीचे उल्लंघन होणार नाही, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदूषणासंबंधात दिलेल्या आदेशात नमुद बाबींचे तंतोतंत पालन करावे लागेल. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. असे जिल्हादंडाधिकारी श्री. षण्मुगराजन एस. यांनी काढलेल्या आदेशात नमुद केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment