१५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश


१५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश 
 वाशिम दि.०१(जिमाका) जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी महावीर जयंती,६ एप्रिल रोजी हनुमान जयंती,७ एप्रिल रोजी गुडफ्रायडे,९ एप्रिल रोजी ईस्टरसंडे, १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती  जिल्ह्यात सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे.
          सद्यस्थितीत विविध पक्ष/ संघटना/सामाजिक कार्यकर्ते हे वेगवेगळ्या मागण्यासाठी धरणे/आंदोलने/ उपोषणे करीत आहे. जिल्हा सण व उत्सवाच्या तसेच राजकीय दृष्टीने संवेदनशील आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे सोयीचे व्हावे यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) अन्वये १५ एप्रिल २०२३ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी श्री.षण्मुगराजन एस.यांनी लागू केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश