18 एप्रिल रोजी मार्जिन मनी योजना कार्यशाळा
- Get link
- X
- Other Apps
18 एप्रिल रोजी मार्जिन मनी योजना कार्यशाळा
वाशिम, दि. 17 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व लाभार्थ्यांना व्हावी आणि योजनांचा लाभ देण्याचे उदिष्ट साध्य व्हावेत याकरीता राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय पर्व कार्यक्रम 1 एप्रिल ते 1 में 2023 दरम्यान साजरा करण्यात येत आहे.
सामाजिक न्याय पर्वाअंतर्गत 18 एप्रिल 2023 रोजी जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना येणाऱ्या समस्या व अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल तसेच लाभार्थ्यांचे मनोगत घेण्यात येईल. तरी आयोजीत कार्यक्रमाला जिल्हयातील मागासवर्गीय अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे या कार्यशाळेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment